Breaking

बुधवार, ५ जानेवारी, २०२२

पेठवडगाव मध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याद्वारे प्लॅस्टिकविरोधात जनजागृती व मोफत कापडी पिशवी वाटप*

 

शालेय विद्यार्थ्यांना मोफत कापडी पिशवीचे वाटप


*करण व्हावळ  : विशेष प्रतिनिधी*


पेठ वडगाव  : आज दि. 3 जानेवारी 2022 क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 191 जयंतीनिमित्त महिला आर्थिक विकास महामंडळ व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने  महानगरपालिका व नगर पालिका कार्यक्षेत्रातील शालेय विद्यार्थ्यांना विना मूल्य कापडी पिशवी वाटप करण्यात आले.

कार्यक्रमातील विविध क्षणचित्रे

     यामध्ये उन्नती पेठवडगाव cmrc  तील पेठवडगाव मधील वडगाव विद्यालय वडगांव येथे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रिय समन्वयक मोरे साहेब यांनी कापडी पिशवीचे महत्व तसेच प्लॅस्टिकविरोधात जनजागृती बाबत बहुमूल्य मार्गदर्शन केले तसेच DCO सचिन कांबळे मार्गदर्शन करताना म्हणाले ,विद्यार्थ्यांनी प्लॅस्टिक  विरोधात मोहीम शाळेतून सुरू झाली पाहिजे सर्वानी कापडी पिशवीचा नियमित वापर करावा याबाबत मार्गदर्शन केले.

        सदर कार्यक्रम जिल्हा स्टाफ, विद्यालय मधील शिक्षक, cmrc कार्यकारणी ,व्यवस्थापक, क्षेत्रीय समन्वयक  ,लेखापाल व सहयोगिनी उपस्थित होते.

         सदर उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा