प्रा. चिदानंद अळोळी : नृसिंहवाडी प्रतिनिधी
नृसिंहवाडी : औरवाड येथील श्रीमती श्रीदेवी अशोक अणुजे वय - ६२ या महिलेने घोसारवाड येथील जानकी वृद्धाश्रम येथे जाऊन तेथील वृध्द, अनाथ व्यक्तींना एका दिवसाचे शुद्ध व सात्विक भोजन देऊन एका आगळ्या वेगळ्या सामाजिक उपक्रमाने साजरा केला.या वयात कुटुंबाची जबाबदारी पेलत , सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न या औरवाड च्या महिला सदैव करत असतात. त्यातच या महिलेने या वृद्धांना १ जानेवारी या दिवशी अन्नदान केले.
आमच्या प्रतिनिधीशी बोलताना त्या म्हणाल्या, सद्यस्थितीत युवापिढी ही ३१ डिसेंबर सेलिब्रेशन करत असते, वाढदिवस साजरा करत असते मोठमोठ्या पार्ट्या करत असते.पण त्याच वेळेला दुसरीकडे अशा अनाथ ,वृद्ध ,अपंग लोकांच्याकडे एका सामाजिक बांधिलकीतून आपण सुद्धा मदत केली पाहिजे. यामुळेच याची सुरुवात आम्ही केली आहे. प्रत्येक वर्षी नवीन वर्षाची सुरुवात अशा वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाने करण्याचा प्रयत्न करणार आहे.
या उपक्रमाच्या वेळेस जानकी वृद्धाश्रम चे प्रमुख पुजारी ,
श्रीमती श्रीदेवी अणुजे, श्रीमती विमल सुरेश अणुजे , श्रीमती शानाबाई सुर्यवंशी ई उपस्थित होते. या सामाजिक उपक्रमाचे कौतुक औरवाड सह परिसरात याचे कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा