Breaking

गुरुवार, ६ जानेवारी, २०२२

*जयसिंगपूर कॉलेजमध्ये : जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आयोजित कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीमेचा ८०० विद्यार्थ्यांनी घेतला लाभ*

 

कोविड लसीकरण मोहिमेबाबत मार्गदर्शन करताना डॉ. पी. एस. पाखरे


*प्रा. डॉ. महावीर बुरसे : विशेष प्रतिनिधी:* 


जयसिंगपूर कॉलेज,जयसिंगपूरचे एन.एस.एस.विभाग तथा प्राथमिक आरोग्य केंद्र, जयसिंगपूर यांच्या सहकार्याने केंद्रशासन व महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम राबविण्यात आली. या उद्घाटन प्रसंगी डॉ.पी. एस. पाखरे (तालुका आरोग्य अधिकारी),मा.डॉ. पांडुरंग खटावकर तसेच प्राचार्य,प्रो.डॉ.एम.व्ही.काळे उपस्थित होते.


  प्राथमिक आरोग्य केंद्र, जयसिंगपूर च्या सहकार्याने जयसिंगपूर शहर लसीकरण कार्यक्रमाचा उदघाटन समारंभ जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर येथे दि.04/01/2022 रोजी संपन्न झाला.


      श्री.बी.ए.आलदर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून व प्रास्ताविकामध्ये कार्यक्रम आयोजनाचा हेतू स्पष्ट केला. याप्रसंगी डॉ.पी.एस.पाखरे व डॉ.पी.आर.खटावकर यांनी लसीकरणा संदर्भात विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. 

   कार्यक्रमाचे आभार प्राचार्य, डॉ.एम.व्ही.काळे यांनी मानले. सूत्रसंचालन श्री. बी. ए. पाटील यांनी आपल्या सुंदर शैलीमध्ये केले.या दोन दिवसीय लसीकरणात 800 विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तसेच लसीकरणाचा कार्यक्रम यशस्वी करण्यात श्री. पी.एन.काळे (आरोग्य सहाय्यक)श्री. सुनील हाके साहेब (औषध निर्माण अधिकारी) श्री. एस. एस.आलासकर (आरोग्य सेवक) श्रीमती खटावकर, श्रीमती काटकर (आरोग्य सेविका नागरी विभाग जयसिंगपूर),डाटा ऑपरेटर नगरपरिषद जयसिंगपूर वअंगणवाडी सेविका जयसिंगपूर सहकार्य लाभले. याप्रसंगी प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन उपप्राचार्य, प्रा.सौ.एम.एस.पाटील व पर्यवेक्षक प्रा.बी.ए. आलदर NSS कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रभाकर माने व इतर सन्माननीय प्राध्यापकानी केले.

     या लसीकरण उपक्रमाबाबत  विद्यार्थी घटकाकडून प्राथमिक आरोग्य केंद्र जयसिंगपूर व त्यांच्या टीमचे मनापासून आभार व्यक्त करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा