शिवाजी विद्यापीठ आंतर विभागीय महिला खो-खो विजेती टीम (जयसिंगपूर कॉलेज महिला टीम) |
*प्रा. मेहबूब मुजावर : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : शिवाजी विद्यापीठ आंतर विभागीय महिला खो-खो स्पर्धेचे आयोजन दि.३ व ४ जानेवारी,२०२२ रोजी यजमान कॉलेज म्हणून जयसिंगपूर कॉलेज मध्ये करण्यात आले होते. सदर स्पर्धा अत्यंत यशस्वीपणे संपन्न झाल्या.
या आंतर महाविद्यालयीन खो-खो स्पर्धेचा अंतिम सामना अत्यंत रंगतदार झाला. जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर व ए.आर.पी.कन्या महाविद्यालय इचलकरंजी या दोन सामन्यांमध्ये सुरू असलेला खेळ जयसिंगपूर महाविद्यालयाने एक डाव व एक गुणाने मात करीत निर्विवादपणे हा सामना जिंकला. जयसिंगपूर कॉलेजच्या महिला खो-खो टीमने सुरुवातीपासून सामन्यावर मजबूत पकड ठेवीत सदरचा सामना जिंकून उत्कृष्ट कामगिरी पार पाडली. खो-खो खेळातील विद्यापीठाचा कोठारी फिरता चषक मिळविला.
जयसिंगपूर कॉलेज विजेती महिला खो-खो टीम व मान्यवर |
या सामन्यासाठी जयसिंगपूर कॉलेज महिला टीमची कॅप्टन कु.साक्षी विजय आंबी हिच्या कुशल नेतृत्वाखाली साथीदार खेळाडू निलम संजय चौगुले,प्राजक्ता सुरेश माने,अमृता लक्ष्मण पारदोळेश्रु,ती दत्तात्रय यादव, साक्षी बाबासो गाडवे, प्रतिक्षा रामचंद्र पोवार,प्राजक्ता सुकेशन उदगावे,प्रणाली विश्वास दळवी,हर्षदा सुकुमार मिणचे,मिनाज पटेल व प्रिती रावसाहेब आरेकरी हे खेळाडू सहभागी होते.
या खेळाडूंना संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे,सचिव डॉ.महावीर अक्कोळे,प्रा.आप्पासाहेब भगाटे, अन्य पदाधिकारी व सदस्य यांची प्रेरणा लाभली. त्याचबरोबर महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ. सौ. मनिषा काळे यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले. संचालक शारीरिक शिक्षण प्रा. डॉ. महादेव सूर्यवंशी यांच्या उत्तम नेतृत्वाखाली या महिला टीमने यश मिळविले.
या टीमने मिळवलेल्या यशाबद्दल शिवाजी विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयाकडून सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा