Breaking

सोमवार, २४ जानेवारी, २०२२

*जयसिंगपूरच्या ५२ झोपडपट्टीमधील तरुण बेपत्ता*

 

५२ झोपडपट्टीमधील हनुमंत नागेश बनपट्टे हा तरुण बेपत्ता


*प्रविणकुमार माने : उपसंपादक*


जयसिंगपूर : जयसिंगपूर येथील ५२ झोपडपट्टी मधील २७  वर्षीय तरुण बेपत्ता झाला आहे.

      मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, जयसिंगपूरच्या ५२ झोपडपट्टीमधील हनुमंत नागेश  बनपट्टे वय वर्ष २७ हा तरुण रविवार दि.१६ जानेवारी, २०२२ पासून घरात कोणाला न सांगता  थेट निघून गेला आहे. सदर तरुणाची जयसिंगपूर शहर व परिसरात तसेच मित्रपरिवार नातेवाईक यांच्याकडे शोधाशोध घेतली असता तो मिळून आला नाही. त्यामुळे सुरेश नागेश बनपट्टे यांनी याबाबतची वर्दी जयसिंगपूर पोलिस ठाणेस दिली. सदर घटनेचा पुढील सखोल तपास महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल सौ.स्मिता कांबळे या करीत आहेत.

       सदर घटनेने कुटुंबातील सर्व नातेवाईक तनावामध्ये असून आपणास सदर युवक दिसल्यास पोलीस ठाणे किंवा कुटुंबियांस कळवावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा