वर्धा जिल्ह्यातील एका अपघातात 7 भावी डॉक्टर ठार |
वर्धा : वर्धा जिल्ह्यातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. हा फक्त अपघात नाही तर आरोग्य क्षेत्राचं झालेलं मोठं नुकसान झाल्याचं कळत आहे. महाराष्ट्राने 7 युवा डॉक्टर गमावले असून या डॉक्टरांनी अनेकांची वैद्यकीय सेवा करून अनेकांचे प्राण वाचले असते. परंतु दुर्दैवाने या युवा डॉक्टरांचा मृत्यू झाला.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार , वर्ध्याच्या सेलसुरामध्ये झालेल्या भीषण अपघातानं संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. वर्ध्यातील दत्ता मेघे मेडीकल कॉलेजमधील 7 विद्यार्थ्यांचा या अपघातात मृत्यू झाला. या अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये तिरोडा गोरेगाव येथील भाजप आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा आविष्कारचाही समावेश आहे.
या अत्यंत दुर्दैवी घटनेने सर्वत्र शोककळा पसरली असून लोकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा