Breaking

बुधवार, २६ जानेवारी, २०२२

*रागाच्या भरात कौटुंबिक वादातून भर रस्त्यात केला पत्नीचा निर्घृण खून*

 

हुपरीत पतीकडून पत्नीची निर्घृणपणे हत्या


*प्रविणकुमार माने : उपसंपादक*


कोल्हापूर  :  घरगुती कौटुंबिक वादातून राग आल्याने पत्नी समीना इम्तियाज नदाफ (वय वर्ष २८ मूळ रा. रेंदाळ, सध्या हुपरी) हिचा भररस्त्यावर पाठलाग करून निर्घृणपणे हत्या केली. संशयित आरोपी पती इम्तियाज राजू नदाफ (वय वर्ष ३१, मूळ रा. कोरोची)याने पत्नीवर सत्तूरने सपासप १३ हून अधिक वार करून तिचा खून केला. एमएसईबी कार्यालयाजवळ मंगळवारी रात्री ९.००च्या सुमारास हुपरी (ता. हातकणंगले) येथे ही घटना घडली.

      हल्लेखोर संशयित आरोपी पतीला येथील काही धाडसी युवक व पोलिसांनी पाठलाग करून पकडले. या घटनेने सर्वत्र भीतीदायक वातावरण निर्माण झाले.या हल्ल्यात मृत समीना यांचे वडील सलीम नदाफ हे ही जखमी झाले आहेत.

   अधिकृत सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार,समीना व इम्तियाज यांना दोन मुले असून ते हुपरी येथे राहतात. इम्तियाजचा चिकन विक्रीचा व्यवसाय आहे, तर समीना एमएसईबी कार्यालयाजवळ चिकन ६५ चा गाडा चालवते. काही दिवसांपासून त्यांच्यात वाद होता. त्यामुळे इम्तियाज हा कोरोची या आपल्या गावी गेला होता.

   काल मंगळवारी रात्री ८.४५  वाजण्याच्या सुमारास इम्तियाज पत्नीच्या चिकन ६५ गाड्याजवळ जाऊन तिच्याशी वाद घालू लागला. क्षणार्धात त्याने आपल्याजवळील सत्तूर काढला आणि समीनाच्या डोक्यावर एकच वार करून त्याला जखमी केले .अशा जखमी अवस्थेत समीना एका ईस्त्रीच्या दुकानात आपला जीव वाचवण्यासाठी गेली. त्यानंतर मात्र  हातात सत्तूर घेऊन इम्तियाज तिचा पाठलाग करीत तेथे आला व त्याने समीनावर सपासप 13 हून अधिक वार केले. हल्ला एवढा भीषण होता की, मृत समीनाचा गळा धडावेगळा होण्याच्या मार्गावर होता. तरीही तो तिच्यावर वार करतच होता. 

     रहदारीच्या व अत्यंत गजबजलेल्या रस्त्यावर इम्तियाज हा पत्नीचा खून करून सहजपणे सत्तूर आपल्या मोटारसायकलला अडकवून तेथून निघून गेला.मात्र सदर घटनेची माहिती मिळताच व परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सहायक पोलिस निरीक्षक पंकज गिरी हे घटनास्थळी पोहोचले. तोवर इम्तियाजला तेथील युवकांनी धाडसाने अडवून चोप दिला व त्याला पकडले. या घटनेत समीना यांचे वडील सलीम नदाफ (वय वर्ष ५५) यांच्यावरही वार झाल्याने त्यांना उपचारासाठी कोल्हापूरला हलवण्यात आले आहे. 

       सदर घटनेने परिसरात भीतीचे व धक्कादायक वातावरण निर्माण झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा