Breaking

मंगळवार, २५ जानेवारी, २०२२

*जांभळी येथे अंगणवाडीमध्ये 'राष्ट्रीय बालिका दिन' मोठ्या उत्साहात साजरा*

 

जांभळी मध्ये बालिका दिन साजरा


*शशिकांत घाटगे : जांभळी प्रतिनिधी*


जांभळी  : आज दिनांक २४/०१/२०२२ रोजी जांभळी येथील अंगणवाडीमध्ये राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प शिरोळ 2 बालविकास प्रकल्प अधिकारी-गुजर मॅडम,अंगणवाडी पर्यवेक्षिका-जाधव मॅडम शाळा व्यवस्थापन समिती-घाटगे सर,प्राथमिक शाळा न.1 -मुख्यद्यापीका-शितोले  मॅडम व त्यांचा स्टाफ  या सर्वांची उपस्थिती व मार्गदर्शन मोलाचे लाभले.

     यावेळी दोन मुलींवर शस्त्रक्रिया केलेले लाभार्थी पालक यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी  गुजर मॅडम यांनी मनोगत व्यक्त करताना मुलींना सक्षम बनवा हा संदेश व्यक्त केला.

     कार्यक्रमाला सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे सहकार्य लाभले जाधव मॅडम यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ विद्या गायकवाड यांनी तर आभार सौ राजश्री जाधव यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा