एसटी गँगचा मोहरक्या संजय तेलनाडे गजाआड |
*प्रविणकुमार माने : उपसंपादक*
इचलकरंजी : गेल्या काही वर्षापासून इचलकरंजी व परिसरात आपल्या गॅंग च्या दहशतीद्वारे प्रचंड साम्राज्य निर्माण केले.मात्र मोका अंतर्गत कारवाई झाल्यानंतर मे २०१९ पासून पसार झालेला एसटी गँगचा प्रमुख संजय तेलनाडेला पुण्यात पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे माहिती समोर आली आहे. मात्र कोल्हापूर पोलीस प्रशासनाकडून अजून पर्यंत अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
इचलकरंजी वासी असलेला तेलनाडे बंधूपैकी गँगचा प्रमुख संजय तेलनाडे याला आज शनिवारी १ जानेवारी २०२२ रोजी सकाळी पुण्यात ताब्यात घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
सदरची बातमी इचलकरंजीसह जिल्ह्यात सर्वत्र पसरल्याने संबंधित घटकांकडून सदर घटनेबाबतची शहानिशा करण्यासाठी सातत्याने फोन येत होते. मात्र तरीही पोलीस अधीक्षक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणकडून अधिकृत माहिती मिळत नव्हती. संजय तेलनाडे याला सकाळी पुण्यात ताब्यात घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून दुपारी मिळाली आहे.
सदर गँगविरुद्ध जबरदस्तीने खंडणी, भूखंड फसवणूक व अत्याचार आदीसह विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. तत्कालीन पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी तेलनाडे बंधूसह गँगविरुद्ध १८ मे २०१९ मध्ये मोका अंतर्गत कारवाई केली होती. त्यानंतर तेलनाडे बंधूसह त्यांचे सर्व साथीदार पसार झाले होते. तरीही साथीदारांच्या वाढत्या कारनाम्यांनंतर गँगवर दुसऱ्यांदा मोका अंतर्गत कारवाई झाली होती.
या घटनेने इचलकरंजी व परिसरात एकच खळबळ माजली असून इतर गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा