Breaking

सोमवार, ३१ जानेवारी, २०२२

*जयसिंगपूर पोलिसांनी सराईत दुचाकी चोरट्याच्या मुसक्या आवळल्या*

 

जयसिंगपूर पोलिसांनी दुचाकी चोरट्यास केलं जेरबंद


*जीवन आवळे :  जयसिंगपूर प्रतिनिधी*


    जयसिंगपूर : जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका संशयित आरोपीस ३ मोटरसायकलीसह अटक करण्यात आली आहे.सदरचा संशयित आरोपी श्री. दिलीप भरत जुवे वय वर्ष ३३ असून सध्या रा. जयसिंगपूर ता. शिरोळ जि. कोल्हापूर असा आहे.

        जयसिंगपूर पोलीस ठाणे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांचे  आदेशाप्रमाण जयसिंगपुर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाकडील पो.ना. अभिजीत भातमारे, पो. कॉ. संदेश शेटे, पो.कॉ. रोहीत डावाळे, पो.कॉ. २५४५  वैभव सुर्यवंशी यांनी जयसिंगपूर पोलीस ठाणे हद्दीतील रेल्वे स्टेशन रोड ते क्रांती चौक जयसिंगपूर रोडवरून पेट्रोलिंग करीत असताना क्रांती चौक येथे एक इसम संशयीतरित्या विना नंबरप्लेट मोटार सायकलवरुन फिरत असताना दिसून आला. त्यावेळी त्यास थांबवून  ताब्यात घेतले असता तसेच जयसिंगपूर पोलिसांनी सराईत दुचाकी चोरट्याच्या मुसक्या आवळल्या* व तिचे कागदपत्राबाबत चौकशी केली असता त्याने काही समाधानकारक माहीती न सांगता उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावेळी त्यास विश्वासात घेवून चौकशी केली असता त्याने सदरची मोटरसायकल ही जयसिंगपूर येथील पायोस हॉस्पीटलचे पार्किंग मधुन एक ते दिड महिन्यापूर्वी चोरी केले असलेचे सांगितले

       त्याबाबत जयसिंगपूर पोलीस ठाणे अभिलेखावर पाहणी केली असता सदर मोटारसायकलबाबत जयसिंगपुर पोलीस ठाणे गु र नं ३४/२०२२ भादवि स कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. तसेच त्यास  मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो जयसिंगपूर यांचे समोर हजर केले असता त्यांनी त्यास तीन दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केले होते. त्यानंतर त्याचेकडे अधिक तपास केला असता त्याने मिरज व सांगली येथुन दोन गाड्या चोरी केल्याचे कबुल दिली. सदरच्या गाडया सरकारी दवाखान्याचे पाठीमागे असलेल्या झोपडपट्टी लगतच्या मोकळे जागेतुन जप्त करून तसा त्याचा सविस्तर पंचनामा केला आहे.

      सदर मोटारसायकल बाबत सांगली शहर पोलीस ठाणे गु.र.नं.३४/२०२२. मिरज शहर पोलीस ठाणे गु.र.नं. ४०/२०२२ भा.द.वि.स. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

    तरी संशयीत आरोपी  दिलिप भरत जुवे वय वर्ष ३३ रा. आश्रयनगर निपाणी जि. बेळगाव राज्य कर्नाटक मात्र सध्या रा. सरकारी दवाखान्यापाठीमागे या संशयित आरोपी कडून  १) हिरो होंडा कंपनीची सी.डी. डिलक्स मोटर  सायकल २)होंडा कंपनीची ड्रिमयुगा मोटार सायकल ३) हिरो होंडा स्पेनल्डर प्लस मोटार सायकल अशा एकुण ६०,०००/- रु मूल्याच्या तीन मोटारसायकली संशयीत आरोपीकडून ताब्यात घेतली आहेत.

     जयसिंगपूर पोलिसांच्या या उत्तम कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा