Breaking

सोमवार, ३१ जानेवारी, २०२२

*युवकांसाठी मिशन नोकरी शिबीर संपन्न ; कृष्णा पंचगंगा सेवा फाउंडेशनचा उपक्रम कौतुकास्पद : राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर*

 

राज्यमंत्री डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची प्लेसमेंट सेलला भेट


*प्रा. चिदानंद अळोळी : नृसिंहवाडी प्रतिनिधी*


कुरुंदवाड- शिरोळ सह कुरुंदवाड परिसरातील सर्व गावांसाठी कृष्णा पंचगंगा सेवा फौंडेशन तर्फे मोफत 'मिशन नोकरी' अभियान रविवार दि 30/01/2022 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत , साने गुरुजी विद्यालय कुरुंदवाडच्या प्रांगणात  कोविडचे नियम पाळून पार पडले.

      या कार्यक्रमाची सुरुवात  राज्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त त्याच्या प्रतिमेस पुष्पहार घालून त्यांना अभिवादन करून करण्यात आले. त्यावेळी कृष्णा पंचगंगा सेवा फौंडेशनचे अध्यक्ष प्रसाद दुग्गे  यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, राज्यमंत्री नामदार यड्रावकर यांनी कृष्णा-पंचगंगा फाउंडेशन च्या कामाचे  कौतुक करताना त्यांनी राबविलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे असे सांगितले, आणि संस्थेचे संस्थापक प्रसाद दुग्गे यांना शाबासकी दिली व पुढील कार्यास शुभेच्या दिल्या. राज्यमंत्री यड्रावकर यांनी नोकरीसाठी आलेल्या सर्व युवक व युवतीना मोलाचे मार्गदर्शन केले आणि शुभेच्छा दिल्या.  त्यानंतर सर्व नोकरीसाठी इच्छुक उमेदवाराची मुलाखत घेण्यात आली . या मध्ये एकूण 179 उमेदवारांनी मुलाखती दिल्या. या मध्ये 10 वी, 12 वी, पदवीधर, उच्च पदवीधर युवक युवती यांचा समावेश होता . त्यांच्या आवडत्या क्षेत्रामध्ये व त्यांना इच्छित शहरात नोकरी मिळवून देण्याचे प्रयत्न या नोकरी मिशनच्या अभियानामुळे  होणार आहे.

      ग्रामीण भागातील सुशिक्षित, बेरोजगार , नोकरीतला अनुभवी असणाऱ्या 179 तरुण तरुणीना आज याचा लाभ घेतला .

      फाऊंडेशनचे अध्यक्ष  प्रसाद दुग्गे यांनी यावेळी   बोलताना  आवाहन केले  ग्रामीण भागातल्या मुलांसाठी आमच्या संस्थेमार्फत मिशन नोकरीचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व सुशिक्षित बेरोजगार यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा..

कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा