Breaking

गुरुवार, २० जानेवारी, २०२२

*संतापजनक !जयसिंगपूर शहरातील एका युवतीवर बलात्कार*

 

जयसिंगपुरात एका युवतीवर बलात्कार


*प्रविणकुमार माने : उपसंपादक*


   जयसिंगपूर शहरातील एका युवतीवर जबरदस्तीने वारंवार बलात्कार करून पीडित मुलगी गरोदर राहिली आहे त्यामुळे परिसरात संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे.

       जयसिंगपूर शहरांमध्ये एका युवतीवर वारंवार जबरदस्तीने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत पीडित युवतीने जयसिंगपूर पोलीस ठाणे मध्ये संशयित आरोपी म्हणून सचिन प्रकाश मोहिते रा. राजीव गांधी नगर जयसिंगपूर यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

   याबाबत कलम ३७६, ३२३ व ५०६ प्रमाणे बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना ऑक्टोबर २०२१ ते आज पर्यंत वारंवार श्याम नगर येथील शेतात असलेल्या पडक्या घरामध्ये नेऊन अत्याचार केला आहे.

     याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,या घटनेतील संशयित आरोपी सचिन मोहिते एकमेकांच्या घराशेजारी राहत असून एकमेकांच्या ओळखीचे आहे तसेच सदर ओळखीचे रुपांतर मैत्रीमध्ये झाले त्यानंतर त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. परंतु यातील आरोपी याचे  सप्टेंबर २०२१ मध्ये लग्न झाले. त्यानंतर आरोपी व फिर्यादी यांचे कोणतेही संबंध नव्हते दरम्यानच्या काळात संशयित आरोपी सचिन मोहिते याने त्या पीडित व्यक्तीला त्याच्या आई व भाऊ यांना मारहाण करण्याची धमकी देऊन जबरदस्तीने श्याम नगर येथील शेतात असलेल्या पडीक घरामध्ये जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले आहे. मात्र  पोट दुखीचा त्रास होऊ लागल्याने भीतीपोटी सोनोग्राफी करण्यात आले. त्यानंतर सदर पीडित युवती गरोदर असल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

    सोनोग्राफी नंतर पीडित युवती गरोदर असल्याची माहिती समजताच तिच्या नातेवाईकांनी पोलिसांमध्ये धाव घेऊन संशयित आरोपी सचिन प्रकाश मोहिते याच्यावर ३७६ प्रमाणे बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल टकले करीत आहेत.

      या घटनेने संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा