माती परीक्षण करताना अधिकारी |
*प्रा. अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*
कोल्हापूर : महिला आर्थिक विकास महामंडळ व रिलायन्स फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उन्नती पेठवडगाव लोकसंचलित साधन केंद्रातील तासगाव व MKVG –हातकणगले लोकसंचलित साधन केंद्रातील कुंभोज याठिकाणी माती परीक्षण आयोजित करण्यात आले होते.
सुरवातीला व्यवस्थापक यांनी आजचा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश सांगितला. यानंतर रिलायन्च्या खडके यांनी फौडेशन मार्फत सुरू असलेल्या कामाची माहिती दिली व भविष्यात बचत गटातील महिलांसोबत विविध उपक्रम राबविले जातील असे आश्वासन दिले यानंतर RCF चे व्यवस्थापक संदीप सर यांनी RCF हे शेतकरी वर्गासाठीच काम करत आहेत. शेतीसाठी आवश्यक असे शेतीखत तयार केले जाते तसेच शेती विषयक नवनवीन तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढेल याविषयी मार्गदर्शन येथोचित मार्गदर्शन केले. यानंतर माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सचिन कांबळे म्हणाले, माती परीक्षणचा फायदा जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा तसेच नवतेजस्विनीमध्ये महिलांचे उत्पन्न वाढवण्यावर भर दिला जाईल. त्याचबरोबर महिलांना विविध विभागाशी समन्वय साधून लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल.
यानंतर महिलांना प्रत्यक्ष माती परीक्षण केले जाते याचे प्रात्यक्षिक करण्यात आले.यामध्ये माती कशी उखरने, मातीचे चार भाग करून त्यामधील समोरासमोरील भाग काढून टाकणे असे दोन वेळा करून शेवटी शिल्लक माती ही प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठवली जाते यावरून असे स्पष्ट होते की, सदर शेत जमीन ही सोयाबीन लागवड करिता अनुकूल आहे की नाही शेवटी उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपला असे सहयोगिनी सांगितले.
सदर कार्यक्रमास माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सचिन कांबळे ,सहा सनीयत्रण अधिकारी उमेश लिंगणुरकर, रिलायन्सचे मारुती खडके ,RCF चे व्यवस्थापक संदिप सोकाशी ,उन्नती पेठवडगाव लोकसंचलित साधन केंद्र व MKVG –हातकणगले लोकसंचलित साधन केंद्रातील अध्यक्षा, व्यवस्थापक ,सहयोगिनी ,CRP व बचत गटातील ९० महिला उपस्थित होत्या.
या उपक्रमाचं संबंधित बचत गटातील महिलांनी कौतुक केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा