दत्त कॉलेजच्या क्रीडा स्पर्धेत मार्गदर्शन करताना प्रदीप पाटील |
*प्रा.अमोल सुंके : कुरुंदवाड प्रतिनिधी*
कुरुंदवाड : विद्यार्थ्यांनी तंदुरुस्त राहणे ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ खेळणे आवश्यक आहे त्यासाठी श्रीदत्त कनिष्ठ महाविद्यालयाने आपल्या विद्यार्थ्यांना संधी प्राप्त करून दिली असे हरक्यूलिस जिमचे प्रमुख प्रदीप पाटील यांनी प्रतिपादन केले.
कुरुंदवाड येथील श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयातील वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. आर.जी.पाटील, ज्येष्ठ प्रा. एम. आर. पवार सर, क्रीडाशिक्षक एस. एस. गडदे महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
क्रीडा स्पर्धेतील विविध क्षणचित्रे |
या स्पर्धेमध्ये मुली-मुलांच्या कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल व रस्सीखेच या सांघीक स्पर्धांचे आयोजन केले होते. तर वैयक्तिक प्रकारात 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे, 400 मीटर धावणे, बुद्धिबळ, गोळाफेक, थाळीफेक व लांब उडी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व स्पर्धांसाठी विद्यार्थी व विद्यार्थिनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यासाठी संस्थेचे कार्यशील संचालक गौतम भाऊ पाटील व पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर शालेय समिती अध्यक्ष रावसाहेब पाटील, शालेय समिती सदस्य सुतार गुरुजी, घोरपडे वहिनी व कार्याध्यक्ष गावडे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
सदर स्पर्धा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा