एनसीसी युनिटची कोरोना जनजागृती रॅली |
*प्रा. अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी*
कागल : डी आर माने महाविद्यालय एनसीसी विभाग हा सातत्याने रचनात्मक कार्यामध्ये सहभाग असतो. त्याचाच एक भाग म्हणून एन. सी. सी विभागाच्या वतीने कागल शहरात कोविड १९ प्रतिबंधात्मक जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.
विविध क्षणचित्रे |
ही रॅलीची सुरवात महाविद्यालया पासून सुरू आली आणि रॅलीचे उद्घाटन मा. प्राचार्य डॉ. प्रवीण चौगले यांनी केले. त्यांनी कोरोना जनजागृती विषयी रॅलीला संबोधित केले. यावेळी कागल शहरात रॅलीच्या माध्यमातून एन.सी. सी. कॅडेटसनी कोरोना जनजागृती विषयी पथनाट्य उत्तम सादरीकरण केले. कागल शहरात प्रत्येक चौकात जाऊन पथनाट्याचे सादरीकरण करून समाजातील लोकांपर्यंत जनजागृतीचा संदेश पोहचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी एन. सी. सी. प्रमुख कॅप्टन प्रा. डॉ. संतोष जेठिथोर यांच्या उत्तम नेतृत्वाखाली व प्रा.आबासाहेब चौगले यांच्या साथीने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
कागल शहरातील सुजाण नागरिकांनी सदर रॅलीस प्रतिसाद दिला. ५ महाराष्ट्र बटालियनच्या एनसीसी विभागाचा सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा