उद्यान पंडित गणपत दादा पाटील यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना पत्रकार रोहित जाधव |
*जीवन आवळे : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : रोहित जाधव यांनी शिरोळ तालुक्यात पत्रकारीतेच्या माध्यमातून उत्तम लेखणीतून नागरिकांच्या मनात ठसा उमटवला,नागरिकांच्या हक्कासाठी लढून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला,सामाजिक तसेच राजकीय बातम्या प्रखरपणेआणि रोखठोकपणे लावून त्यांनी युवा पत्रकार वर्गात एक आदर्शवादी स्थान निर्माण केलं आहे,अगदी कमी वयात आणि अल्पशा कालावधीत पत्रकार क्षेत्रात आपली ओळख निर्माण करून लोकप्रियता मिळवली.
रोहित जाधव यांच्या निर्भिड पत्रकारितेमुळे त्यांनी समाजासमोर एक स्थान निर्माण केले आहे याबद्दल स्वराज्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जयसिंगपूर यांच्या वतीने पत्रकार रोहित जाधव यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार काल प्रदान करण्यात आला,
हा कार्यक्रम काल रोटरी क्लब जयसिंगपूर येथे आयोजित करण्यात आला होता,या कार्यक्रमास उद्यान पंडित गणपत दादा पाटील व शिरोळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांची प्रमुख उपस्थिती लाभली,
त्याच बरोबर स्वराज्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एज्जाज मुजावर,जयसिंगपूर नगरी साप्ताहिक व जयसिंगपूर नगरी न्युज चे संपादक राजू सय्यद, डॉ. खटावकर, नगरसेवक बजरंग खामकर,रोशन महाराष्ट्र न्यूजचं संपादक इकबाल इनामदार, जयहिंद न्यूज नेटवर्कचे संपादक प्रा.डॉ.प्रभाकर माने तसेच पत्रकार वर्ग व जयसिंगपूर मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खुप खुप धन्यवाद सर.
उत्तर द्याहटवा