निवेदन देताना समस्त बौद्ध बांधव प्रतिनिधी |
*रोहित जाधव : शिरोळ तालुका प्रतिनिधी*
शिरोळ : मौजे गौरवाड ता. शिरोळ येथे ग्राम मिळकत नंबर 525 ही मिळकत दलित समाज गौरवाड यांची नावे नोंद आहे, सदर मिळकतीचे देखभाल व दुरुस्तीसाठी मा. मंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर साहेब यांच्या आमदार फंडातून मंजूर झालेले आहे, सदरचे देखभाल व दुरुस्तीचे काम हे ग्रामपंचायत गौरवाड यांचेमार्फत सदर ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक हॉल चे बांधकाम चालू असताना श्री अन्वर चंदन जमादार यांनी बांधकाम बंद पाडण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यामुळे सदरचे बांधकाम हे बंद झालेले आहे, यामुळे दलित मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे
नरसिंह सरस्वती देवस्थान जमिनीमध्ये गौरवाड सार्वजनिक पाणीपुरवठा(पाण्याची टाकी) ग्रामपंचायतीच्या वतीने श्री अन्वर चंदन जमादार हे ग्रामपंचायत सदस्य असताना त्यांच्या कारकिर्दीत बांधली, अशी वस्तुस्थिती असताना श्री अन्वर चंदन जमादार हे जाणून बुजून राजकीय दृष्टिकोनातून ग्रामस्थांना व बौद्ध समाजाच्या जनतेस नाहक त्रास देत असल्यामुळे अश्या समाजकंटक व्यक्तीवर दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार अन्वर चंदन जमादार यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा नोंदवावा व त्यांचे आंदोलन ताबडतोब थांबवावे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक हॉल चे बांधकाम सुरू करणे बाबत परवानगी द्यावी, अन्यथा 26 जानेवारी 2022 रोजी भारताच्या 75व्या अमृत महोत्सव दिनानिमित्त समस्त बौद्ध समाज गौरवाड व ग्रामस्थ हे पंचायत समिती शिरोळ येथे तीव्र आंदोलन करेल,
याबाबतचे निवेदन मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, जिल्हाधिकारी कोल्हापूर, तहसीलदार शिरोळ, शिरोळ पोलीस ठाणे, कुरुंदवाड पोलीस ठाणे, ग्रामपंचायत गौरवाड यांना देण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा