दिल्ली : ५७० पदांसाठी भरती केली जाणार आहे.त्यानुसार इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. पश्चिम क्षेत्र मार्केटिंग विभागात टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल शिकाऊ (अप्रेंटिस) उमेवारांच्या ५७० पदांसाठी भरती केली जाणार आहे. उमेदवार १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
निवड प्रक्रियेसाठी खालील वेबसाईट वर जाऊन
iocl.com उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. १०० गुणांची लेखी परीक्षेसह कागदपत्र पडताळणीनंतर एकूण ५७० उमेदवारांची निवड केली जाईल. तसेच इंडियन ऑइल द्वारे २१ मार्च २०२२ रोजी लेखी परीक्षा घेतली जाईल.
सदर परीक्षा ही उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आहे त्याचा लाभ घ्यावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा