Breaking

शुक्रवार, २८ जानेवारी, २०२२

*"महाविकास आघाडी" सरकार जनतेचे की मधधुंद्यांचे ? ;तृप्ती देसाई*

 


Source : nuaiyduniya.com


*करण व्हावळ :  विशेष प्रतिनिधी*


  सरकारने उत्पन्न मिळविण्याच्या स्वार्थापोटी राज्यातील सुपरमार्केट आणि जनरल स्टोअर्स मध्ये वाईन मिळण्याचा मार्ग मोकळा केला आहे. त्यानुसार राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयावरून सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई  आक्रमक झाल्या असून माध्यमांशी बोलताना देसाई म्हणाले की,'या सरकारने चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवली आणि आता सुपर मार्केटमध्ये वाईन मिळणार यांना तरुणांचे भविष्य घडवायचे आहे की अंधारात ठेवायचे आहे. दारूमुळे अनेक संसार उद्ध्वस्त झालेले आहेत, अनेक तरुण  गैरमार्गाला लागले आहेत, गुन्हे वाढत आहेत त्यात असा निर्णय घेणे पूर्णपणे चुकीचे आहे हे सरकार जनतेची की दारुड्यांचे हे एकदा महाविकास आघाडी सरकारने सांगावे', असा प्रश्न तृप्ती देसाई यांनी उपस्थित केला आहे.

    सरकारच्या या निर्णयाने तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या मनात सरकारच्या लोककल्याणकारी हेतू बाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा