Breaking

शुक्रवार, २८ जानेवारी, २०२२

*प्राध्यापकाचे दातृत्व ! जयसिंगपूर कॉलेजमधील कनिष्ठ विभागात आर्ट्स व कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना शब्दकोश वाटप*


इंग्रजी शब्दकोशाचे वाटप


*प्रा.डॉ. महावीर बुरसे : विशेष प्रतिनिधी*


जयसिंगपूर : जयसिंगपूर कॉलेज मधील कनिष्ठ विभागातील आर्ट्स व कॉमर्स शाखेकडील इंग्रजी विषयाचे शिक्षक श्री.बी.ए.पाटील यांच्या सहकार्याने अकरावीच्या विद्यार्थ्यांना शब्दकोश वाटप समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी इंग्लिश क्लब व  फिल्म क्लब या नवोपक्रमाची सुरुवात करण्यात आली.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.  सौ.एम.व्ही.काळे उपस्थित होत्या. 

       कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक श्री.बी.ए.पाटील यांनी केले तसेच इंग्लिश क्लब व फिल्म क्लब या  नवोपक्रमाची  उद्दीष्टे  स्पष्ट केले. प्राचार्य डॉ.मनिषा काळे यांनी अध्यक्षीय मनोगतामध्ये म्हणाल्या, इंग्रजी विषयाचे महत्त्व विशद करून या विषयामुळे व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वामध्ये होत असलेला अमुलाग्र बदल प्रभावी असतो व विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजी भिती कमी होण्यासाठी अशा उपक्रमाचा उपयोग निश्चितच होईल असे मत मांडले. 


      याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सौ.एम.एस.पाटील, डॉ.एम.जे.बुरसे, श्री.एस.डी.चौगुले उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार श्री.एस.बी.परीट यांनी मानले.या प्रसंगी एस एस पाटील, ,श्री.एस.के.पाटील,सौ.ए.एस.चावरे,सौ.एस.व्ही.बस्तवाडे,सौ.के.एस.पाटील आदी शिक्षक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

   सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. स्नेहा कांबळे व मेहक मुल्ला या विद्यार्थिनींनी उत्तमपणे पार पाडले. कनिष्ठ विभागाच्या या रचनात्मक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा