Breaking

शुक्रवार, २८ जानेवारी, २०२२

*मा.तहसीलदार मा.सतिश पांडुरंग कदम यांनी शिवाजी विद्यापीठाची अर्थशास्त्र विषयातील पीएच.डी. पदवी केली संपादन ; मार्गदर्शक म्हणून डॉ.विजय कुंभार लाभले*

 

तहसीलदार मा.सतीश कदम व डॉ.विजय कुंभार


प्रा.डॉ. प्रभाकर माने  :  मुख्य संपादक


    *संघर्षमय प्रवासाची पार्श्वभूमी असलेले 


जयसिंगपूर : रायगड जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार मा.सतीश पांडुरंग कदम यांनी शिवाजी विद्यापीठाची अर्थशास्त्र विषयातील पीएच.डी. पदवी नुकतीच संपादन केली"Analytical Study of Public Infrastructure Facilities In Sindhudurg District"  हा संशोधनात्मक प्रबंध सादर केला होता. शिवाजी विद्यापीठाने मा.कदम यांना पीएच.डी. पदवी प्रदान केली आहे.याकामी  संशोधक मार्गदर्शक म्हणून डॉ. विजय कुंभार यांचे यथोचित मार्गदर्शन लाभले.

पीएच.डी. मार्गदर्शक डॉ. विजय कुंभार

      मा.सतिश कदम यांना पीएच.डी. कामी मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधनात्मक कार्याच्या माध्यमातून सुपरिचित असलेले व्यक्तिमत्व व बँकिंग विभाग प्रमुख डॉ. विजय कुंभार यांचे सुयोग्य व उत्तम मार्गदर्शन लाभले.

तहसीलदार मा.सतीश कदम

    रायगड जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार (पुनर्वसन) मा.सतिश पांडुरंग कदम यांचा नायब तहसीलदार पदी रुजू होईपर्यंतचा जीवन पट अत्यंत प्रतिकूल व धक्कादायक होता. यावर मात करीत गुरुरुपी आईच्या आशीर्वादाने दिलेल्या कृतिशील विचार व संस्काराच्या शिदोरीने मा.तहसीलदार साहेब यांचे आयुष्य फुलले. यासाठी मात्र त्यांच्या मातोश्रींने केलेले काबाडकष्ट विसरून चालणार नाही.

     मुळात माणसाच आयुष्य उज्वल घडतं दोन कारणांनी एक तर आईवडिलांची  वडिलोपार्जित संपत्ती व  वारसा हक्कानी होय.मात्र दुसऱ्या कारवानी अर्थात स्वतःच्या स्वकर्तुत्वाने व गुरुवर्याच्यामुळे शक्य असते. मात्र आईरुपी गुरुच्या साथीने मा. तहसीलदार साहेबांच्या आयुष्य घडले आणि खऱ्या अर्थाने जनतेची किंबहुना समाजाची सेवा बांधिलकीच्या भावनेतून करण्याची प्रेरणा मिळाली.


        कुटूंबात सध्या आई, भाऊ, पत्नी, दोन मुली, भावाची पत्नी, त्यांची मुलगी असा परिवार आहे. मुळातच गरीब कुटूंबात जन्म झाला पण एक मुलगी शिकली की संपुर्ण कुटुंब शिकते याप्रमाणे मा. तहसीलदारांच्या आईने १९७६ साली B.Sc. पदवी पर्यंत शिक्षण घेतले व त्याच उमेदीने तिने तिच्या तिन्ही मुलांना शिकवले. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, गरीबी आ वाचून उभी, छपराचे घर व कंदिलाच्या मंद प्रकाशात शिक्षण घेत SSC पुर्ण केले. नंतर पदवी व  पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. शिक्षण घेत असताना आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने घरापासून सुमारे जाता-येता ४ कि.मी. अंतराची पायपीट करून १० वी पर्यंतचे शिक्षण घेतले. अत्यंत हुशार असल्याने नेहमीच वर्गामध्ये गुणवत्ता यादीत झळकायचे. सर्वात महत्वाचे म्हणजे आर्थिक प्रतिकूल परिस्थितीमुळे कॉलेजमध्ये अर्थशास्त्र  विषयात प्रथम क्रमांक असताना त्यांनी एम. ए.च्या पदव्युत्तर शिक्षणासाठी  कराडच्या बाहेर शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अथवा पुणे येथे प्रवेश घेणे शक्य नसल्याने त्यांनी सदगुरु गाडगे महाराज कॉलेज कराड येथे M.A. साठी प्रवेश घेतला आणि खऱ्या अर्थाने त्यांचे आयुष्यच पालटले. त्यांनी सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज मधील स्पर्धा परीक्षा केंद्रात प्रवेश घेऊन गुरुवर्य प्रा. आर.बी.पाटील यांच्या उत्तम  मार्गदर्शनाखाली स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू केला. तत्पूर्वी आईने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सुयश संपादन करून चांगल्या पदावर विराजमान व्हावे अशी तीव्र इच्छा व्यक्त केली होती. त्यासाठी मातेने यासाठी विद्यार्थिदशेपासून दिलेली विश्वास व निर्माण केलेलं वातावरण यामुळे उच्च ध्येयपूर्ती गाठण्यासाठी मनाने पूर्ण तयारी केली होती. मात्र प्रा.आर.बी. पाटील यांचं प्रामाणिक सहकार्य व मार्गदर्शन यामुळे डॉ. कदम यांनी स्पर्धा परीक्षेत अल्पावधीत यश प्राप्त केले.त्याचबरोबर SGM कॉलेज,कराडचे ही सहकार्य प्रचंड लाभले. सन २००१ मध्ये एम.ए. अर्थशास्त्रातील पदवी परीक्षा, राज्यसेवा मुख्य परीक्षा व PSI/STI/Asst. ची ही मुख्य परीक्षा पास झाले. एकाच वेळी स्पर्धा परीक्षेतील यश हे त्यांच्या कुशाग्र बुद्धी, प्रामाणिक अभ्यास व जिद्द- चिकाटी, प्रचंड संयम व मातेने ठेवलेला विश्वास यामुळे ते शक्य झाले.

      सदर जय्यत तयारीसाठी असंख्य स्पर्धा परीक्षेच्या संदर्भग्रंथांची आवश्यकता होती. अशावेळी एका बाजूला प्रचंड दारिद्र्य परंतु घरच्यांनी दिलेले नैतिक पाठबळ व मित्रांनी वेळोवेळी केलेले आर्थिक सहाय्य यामुळे शक्य झाले.मुळातच सामाजिक दृष्ट्या संवेदनशील व मनमिळावू असल्याने त्यांचा मित्र परिवार प्रचंड मोठा आहे. त्यांच्या सुस्वभावामुळे अनेक जण त्यांचे मित्र बनत असतात. समाजातील अत्यंत गरीब, वंचित व गरजू घटकांना ते कॉलेज जीवनात इतरांच्या साथीने मनापासून मदत करीत असत.

         श्री. तहसीलदार मा.सतिश पांडुरंग कदम शनिवार पेठ, मार्केट यार्ड, विठ्ठल नगर, कराड,ता. कराड, जि. सातारा येथील असून ते सध्या तहसिलदार (पुनर्वसन) जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड अलिबाग येथे सेवा बजावीत आहेत.

     प्राथमिक शिक्षण (१ली ते ४ थी) :- कराड नगरपरिषद शाळा क्र.८, माध्यमिक शिक्षण (५वी ते १०वी),यशवंत हायस्कूल कराड व  पदवी शिक्षण:- वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड़ अर्थशास्त्र या विषयात पदवी परिक्षेत संपूर्ण कॉलेजमध्ये दुसरा क्रमांक व अर्थशास्त्र विषयात प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्यानंतर सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराड येथे पदव्युत्तर शिक्षण एम. ए. (अर्थशास्त्र) या विषयात केले.एम.ए. च्या परिक्षेमध्ये अर्थशास्त्र विषयात कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला.

     सन २००० सालची राज्यसेवा मुख्य परिक्षा उत्तीर्ण होऊन नायब तहसिलदार पदासाठी निवड झाली व  सन नोव्हेंबर २००२ मध्ये नायब तहसिलदार म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सेवेत रुजू झाले. उत्तम काम व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सन जुलै २०११ मध्ये तहसिलदार या पदावर पदोन्नती झाली.

      कार्यालयीन कामकाजाबाबत

1) सावंतवाडी तहसिलदार म्हणून सन २०१६-१७ या महसुली वर्षात उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल १ ऑगस्ट २०१७ या महसूल दिन रोजी मा. जिल्हाधिकारी सिंधुदूर्ग याच्याकडून प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला.

2) रायगड जिल्हयातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ या कालावधीतील निवडणूकीचे कामकाज उत्कृष्ट पणे पार पाडल्याबाबत मा. जिल्हाधिकारी रायगड यांनी प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला. 

3) मार्च २०२० पासून कोव्हिड -१९ या विषाणूचा प्रादुर्भाव सुरु झाला. संपूर्ण जिल्हयात मोठ्या प्रमणावर कोव्हिड-१९ ये रुग्ण वाढत असताना जिल्हयातील या विषाणूच्या नियंत्रणासाठी त्यांना दिलेली जबाबदारी जीवाची परवा न करता एखाद्या योध्याप्रमाणे जबाबदारीने सांभाळली.

     विविध शासकीय योजनेचा लाभ उपलब्ध करुन देण्यासाठी ते नेहमी कटिबद्ध असतात परंतु कर्तव्या बरोबर माणूस म्हणून ही त्यांची प्रतिमा व त्यांचे कार्य खूप कौतुकास्पद आहे. त्यांनी मिळविलेली अर्थशास्त्रातील पीएच.डी.पदवी प्राप्त करणे हा हेतू नोकरीसाठी नसून गुणवत्तापूर्ण संशोधनात्मक कार्य घडावे व  संशोधन कार्याचा लाभ समाजास व्हावा हा उदात्त हेतू होता. खरं म्हणजे तहसीलदार म्हणून जनतेची सेवा करीत असताना कोरोना महामारीला अटकाव करण्यासाठी असलेली प्रचंड मोठी जबाबदारी अशावेळी कामाचा प्रचंड ताण तणाव व जबाबदारी असताना डॉ.कुंभार सरांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली व त्यांनी केलेलं वेळोवेळी सहकार्य यामुळे अर्थशास्त्रातील पीएच.डी. पदवी संपादन करू शकले.

        पीएच.डी.पदवी संपादन केल्याने त्यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे. त्यांचा विद्यार्थिदशेपासून ते आजपर्यंत प्रवास हा संघर्षमय असून मात्र आईने दिलेले संस्कार व कुटुंबाने दिलेले नैतिक पाठबळ यामुळे ते शक्य झालं अशी त्यांची प्रतिक्रिया आहे.

    मा. तहसीलदार डॉ.सतीश कदम आपणास जय हिंद न्यूज नेटवर्कच्या लाख लाख शुभेच्छा व पुढील वाटचालीस व आपल्या राष्ट्रीय सेवा भावी कार्यास पुनश्च एकदा शुभेच्छा!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा