Breaking

गुरुवार, २७ जानेवारी, २०२२

*जयसिंगपूर कॉलेजमध्ये ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा*


प्राचार्य डॉ.मनिषा काळे व प्रमुख अतिथी मा.अनुसया मालू


*मालोजीराव माने : कार्यकारी संपादक*


   जयसिंगपूर : जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूरमध्ये ७३ वा प्रजासत्ताक दिन साध्या पद्धतीने साजरा करण्यात आलामहाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सौ. अनुसुया संजय मालू अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी महिला मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.स्थानिक समिती जयसिंगपूरचे अध्यक्ष मा. डॉ. सुभाष बी.अडदंडे व संस्थेचे सचिव डॉ.महावीर अककोळे हे उपस्थित होते.

     सुरुवातीस सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रा. व्ही.के.चव्हाण व गौतम भोसले यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख अतिथी मा.सौ.अनुसुया मालू यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी तिरंग्याला सलामी देत सर्वांनी राष्ट्रगीत गायले.

      कॉलेजच्या प्राचार्या प्रो.डॉ.मनिषा काळे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या, देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करून त्याच्या स्मृती जागृत ठेवाव्यात.तसेच कोरोना महामारीच्या काळात स्वतःचे आरोग्य जपत समाजाच्या आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच देशहितार्थ कार्य करण्यासाठी कटिबद्ध राहून संस्थेच्या व कॉलेजच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सर्वांनी सहकार्य करावे अशी अपेक्षाही व्यक्त केली.

      या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे मा.सौ.अनुसुया मालू उद्बोधीत करताना म्हणाल्या, हा देश जवानांच्या प्रामाणिक देशसेवा कार्यामुळे सुरक्षित असून यानिमित्ताने त्यांच्या सेवाभावी कार्य व शहीद जवानांच्या स्मृती जागृत ठेवणे हे आपलं कार्य आहे. आजतागायत जवानांनी देशासाठी केलेला त्याग व दिलेली आहुती विसरून चालणार नाही तर आजच्या तरुणाईने त्याचं पावित्र्य राखत जवानांबद्दल किंबहुना देशाबद्दल प्रेमभाव व्यक्त करणे. देशाचा स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहणे हे आजच्या तरुणांचं परम कर्तव्य आहे असे त्या म्हणाल्या.

     महाविद्यालयाच्या प्रांगणात मुख्य कार्यालयासमोर अनेकान्त एज्युकेशन सोसायटी गव्हनिंग कौन्सिलचे सदस्य व स्थानिक समिती जयसिंगपूरचे अध्यक्ष मा. डॉ. एस. बी. अडदंडे व संस्थेचे सचिव डॉ.महावीर अककोळे, पद्माकर पाटील, डॉ.शीतल पाटील,शशांक इंगळे,मा.मादनाईक, डॉ.धवल पाटील व स्थानिक समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य, कॉलेजचे तिन्ही शाखेचे उपप्राचार्य, कार्यालयीन अधिक्षक संजीव मगदूम, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य व पर्यवेक्षक, अनेकांत स्कूलचे हेडमास्तर व सर्व शिक्षक, एनसीसी कॅडेट्स, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक,महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थीनीं कोरोना नियमांच्या अधीन राहून उपस्थित होते. 

      या सर्वांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.

1 टिप्पणी: