प्रसिद्ध धन्वंतरी डॉ. महावीर अक्कोळे सांगता समारंभात मार्गदर्शन करताना |
*मालोजीराव माने : कार्यकारी संपादक*
जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर येथे विद्यापीठीय पातळीवरील आंतर विभागीय महिला खो-खो स्पर्धा २०२१-२२ च्या स्पर्धेला ३ जानेवारी,२०२२ पासून प्रसन्न खेळीमेळीचे वातावरण सुरुवात झाली. मंगळवार दि.४ जानेवारी ,२०२२ रोजी या स्पर्धेचा सांगता समारंभ संपन्न झाला. सदर प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे स्थानिक कमिटीचे सचिव डॉ.महावीर अक्कोळे व संस्थेचे सदस्य प्रा.आप्पासाहेब भगाटे, संस्थेचे सर्व पदाधिकारी व कॉलेजच्या प्राचार्या सौ.डॉ मनिषा काळे उपस्थित होत्या.
शिवाजी विद्यापीठ संलग्नित तीन जिल्ह्यांतील महाविद्यालयाने १२ संघ जवळपास १५० महिला खेळाडू, १५ प्रशिक्षक ,शिवाजी विद्यापीठाचे मॅनेजर, कोच व स्पर्धा निरीक्षक यांच्या माध्यमातून सुरू असलेली दोन दिवसीय स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली. या खो-खोच्या अंतिम स्पर्धेत सुरु असलेली लढत जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर व कन्या महाविद्यालय इचलकरंजी यांच्यात सुरू होती. मात्र जयसिंगपूर कॉलेज महिला टीमने हा अंतिम सामना १ डाव राखून निर्विवादपणे जिंकत कोठारी चषक मिळविला
या स्पर्धेच्या सांगता समारोप कार्यक्रमात सहभागी एस सी एम कॉलेज कराड ची खेळाडू विद्यार्थिनीनी आपल्या मनोगतात ,ही स्पर्धा निकोप कशी होईल याच्यासाठी आयोजक कॉलेजच्या कामगिरीचे कौतुक केले. तसेच श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय सांगली च्या प्रा.लीना पाटील यांनी ही स्पर्धा प्रसन्न वातावरणात कशी पूर्ण झाले त्याचं कौतुक करीत खेळाडू व सर्व टीमना पुरवलेली सेवा याबाबत आपली सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करीत कॉलेजच्या भौतिक सोयी सुविधा बाबत त्यांनी भावोउद्गार काढले.
प्रसिद्ध धन्वंतरी व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मार्गदर्शनात म्हणाले, जयसिंगपूर कॉलेज क्रीडा विभाग हा सक्षम असून डॉ.महादेव सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू बनवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. दोन दिवशीय सुरू असलेल्या आंतर विभागीय खो-खो स्पर्धा ही पूर्णपणे खिलाडू वृत्तीने पार पडली.तसेच संस्था व महाविद्यालयाच्या माध्यमातून शक्य त्या सोयी-सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याचबरोबर स्पर्धकांनी दाखवलेली खेळाडू वृत्तीचे त्यांनी कौतुक केले. भविष्यात यापुढेही अशा स्पर्धेचे आयोजन करण्याचा मानस आहे असे त्यांनी उद्गार काढले.
या कार्यक्रमाच्या आभार कॉलेज आयोजक सचिव संचालक, शारीरिक शिक्षण प्रा.डॉ. महादेव सूर्यवंशी यांनी मानले. यासाठी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संस्था, प्राचार्य ,सर्व खेळाडू, कोच, पंच व सर्व मान्यवर घटकांचा आभार मानले.
या सांगता कार्यक्रमात तिन्ही शाखेचे उपप्राचार्य, कार्यालयीन अधिक्षक संजीव मगदूम, समितीतील सर्व घटक तसेच विजेत्या संघातील महिला खेळाडू व अन्य मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेच्या आयोजनाबाबत सहभागी विद्यार्थी व सर्व प्राध्यापक घटकाकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा