ष्ट्रीय मतदार दिन साजरा
राष्ट्रीय मतदार दिन साजरा |
*विक्रांत माळी : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : जयसिंगपूर महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजनाद्वारे २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला.या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सौ.मनिषा काळे उपस्थित होत्या.
कार्यक्रम अधिकारी डॉ.प्रभाकर माने यांनी प्रास्ताविकामध्ये राष्ट्रीय मतदार दिनाचा महत्व विशद करीत युवा मतदार आकर्षित होण्यासाठी उपक्रम राबविणेचे आवाहन केले.
सामूहिक शपथ कार्यक्रमात सहभागी स्वयंसेवक विद्यार्थी व प्राध्यापक |
त्यानंतर कॉलेजचे प्राचार्य प्रो.डॉ.मनीषा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारांमध्ये विशेषतः युवा मतदारमध्ये मतदानाप्रती व लोकशाहीप्रती जनजागृती व्हावी तसेच धर्म,पंथ ,जात ,भाषा, याचे प्रभावा खाली न येता भय मुक्त वातावरणात मतदारांनी मतदान करावे ,यासाठी आज २५ जानेवारी २०२२ रोजी १२ व्या 'राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त' ,मतदारांसाठीच्या प्रतिज्ञेचे सामूहिक वाचन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आभार कार्यक्रम अधिकारी डॉ. के.डी.खळदकर यांनी मानले.
यावेळी.डॉ.एस.बी.बनसोडे, कार्यालयीन अधिक्षक श्री. संजीव मगदूम, कार्यक्रम अधिकारी डॉ.के.डी.खळदकर, प्रो.डॉ.नितीश सावंत,प्रा. सौ. सुपर्णा संसुद्धी, एन. एस.एस.प्रतिनिधी श्री.विक्रांत माळी व एन.एस.एस.चे स्वयंसेवक विद्यार्थी हे महाराष्ट्र शासनाच्या नियमांना अधीन राहून कोरोना नियमाचे पालन करून हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण झाला.
Nice
उत्तर द्याहटवा