Breaking

शनिवार, २९ जानेवारी, २०२२

*स्त्री-पुरुष समानता हेच देशाच्या विकासाचे खरे मापनदंड : संग्राम संस्थेचे मा.सदाशिव माने*

 

जबरदस्ती कसली मर्दानगी या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना
            सदाशिव माने व गुरुदेव माळी


*गौरव पाटील : जयसिंगपूर प्रतिनिधी*


जयसिंगपूर : जयसिंगपूर कॉलेजमध्ये जबरदस्तीत कसली मर्दानगी' या टॅग खाली कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून संग्राम संस्थेचे सदाशिव माने हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योगपती गुरुदेव माळी हे लाभले होते.

       सुरुवातीस या कार्यक्रमात उपस्थित असणारे मान्यवर व उपस्थित घटकांचं स्वागत करून प्रास्ताविक करताना प्रा.डॉ. प्रभाकर माने म्हणाले, आज वैश्विक पातळीवर स्त्रियांचे महत्व अबाधित असून स्त्री पुरुष समानता ही प्रत्येक देशाच्या विकासाचे एक धोतक आहे त्यामुळे संग्राम संस्थेच्या उत्कृष्ट सामाजिक उपक्रमांपैकी जबरदस्ती कसली मर्दानगी हा उपक्रम स्त्री पुरुष समानता जोपासण्याचा प्रयत्न करत आहे.

       संग्राम संस्थेचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते सदाशिव माने मार्गदर्शन करताना म्हणाले, संग्राम संस्थेच्या माध्यमातून सातत्याने महिला सबलीकरण करण्यासाठी प्रयत्न केले जात असतात. त्यामुळे यावेळेस जबरदस्ती कसली मर्दानगी या टँग खाली पोस्टर सादरीकरण व व्याख्यानाच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ते पुढे म्हणाले, स्त्री विना नही उद्धार हे सत्य स्वीकारून प्रत्येक घटकाने महिला सक्षमीकरणासाठी व देश विकास कार्यात महिलांना सामावून घेऊन त्यांच्यावर होणार्‍या अन्यायाविरुद्ध वाचा फोडणे हे आवश्यक आहे. कारण सत्य हेच आहे की, स्त्री पुरुष समानता हेच देशाच्या विकासाचे खरे मापनदंड आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांचा मान सन्मान राखून त्यांना समानतेची वागणूक देणे आवश्यक आहे. त्याचवेळी पुरुषप्रधान मानसिकता दूर करून स्त्री-पुरुष समानतावाली मानसिकता निर्माण होणे महत्वाचे आहे.

       अध्यक्षीय भाषणात तरुण उद्योगपती गुरुदेव माळी म्हणाले, प्रत्येक स्त्री ही अबला नसून सबला आहे यासाठी पुरुषप्रधान मानसिकता बदलणे गरजेचे आहे. ज्या समाजात स्त्रियांना पवित्र मानून त्यांचा मानसन्मान राखला जातो तसेच स्त्री शिक्षणासाठी आग्रह धरला जातो त्या समाजाची सामाजिक व आर्थिक प्रगती झालेली दिसून येते.

     सदर कार्यक्रम हा प्राचार्य डॉ.सौ. मनीषा काळे यांच्या उत्तम मार्गदर्शनानुसार संपन्न झाला. या कार्यक्रमाचे नेमकेपणाने आभार कार्यक्रम अधिकारी डॉ. के.डी. खळदकर यांनी मानले. या सुंदर अशा कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन कु.नेहा राठोड यांनी केले. यावेळी या कार्यक्रमाचे उत्तम व नेटके नियोजन एन.एस.एस. प्रतिनिधी कु.विक्रांत माळी व त्यांच्या टीमने केले.

      सदर कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे असंख्य स्वयंसेवक विद्यार्थी कोरोना नियमांच्या अधीन राहून उपस्थित होते. या कार्यक्रमास संग्रामच्या सौ. कविता सपकाळ व सौ.मॅडम उपस्थित होत्या.

1 टिप्पणी:

  1. सर तुम्ही स्त्री पुरुष समानता या व्याख्यानाचा चांगली माहिती लिहिली आहे.धन्यवाद!

    उत्तर द्याहटवा