विद्यार्थ्यांनी केलेली पाककृती |
*ओंकार पाटील : आगर प्रतिनिधी*
शिरोळ : विजयसिंह पाटील शिक्षण प्रसारक मंडळ आगरभाग शिरोळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल मौजे आगर या विद्यालयात "सावित्री ते जिजाऊ सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा " अभियाना अंतर्गत आज शनिवार दिनांक ०८/०१/२०२२ रोजी " पाककला " या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री.खंडेराव जगदाळे सर शाळेच्या जेष्ठ शिक्षिका सौ. निता कांबळे मॅडम , सहाय्यक शिक्षक मा.श्री. पृथ्वीचंद माछरेकर , सहाय्यक शिक्षक मा.श्री. नितिन बागुल सर , सहाय्यक शिक्षक मा. श्री . भिकू पाटील सर , सहाय्यक शिक्षिका सौ . शुभांगी बोरगावकर मॅडम , शाळेच्या कनिष्ठ लिपिक सौ . सुप्रिया दाभाडे मॅडम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
तसेच शालेय विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारे स्टॉल मांडून उपक्रमामध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदविला यामध्ये इयत्ता ८ वी तील यश पोतदार, सिद्दीक शेख , पृथ्वीराज साळोखे , अभिषेक जाधव , यासिन गवंडी , आरमान गवंडी , गणेश कोकरे ,आदित्य झोरे , सुमित कांबळे , तसेच इयत्ता ९ वी तील कु . समिक्षा पाटील , कु. सादिया खलिफा , कु अंजली शिंदे , कुं .करुणा कांबळे आय्यान कुरणे , रेहान शेख , त्याचबरोबर इयत्ता १० वी तील विद्यार्थी - अवधूत चव्हाण , आदित्य चव्हाण , महेश बोडके , प्रथमेश लोहार , प्रणव कणसे , निलेश कांबळे , आदर्श सावंत , उमर मुजावर इत्यादी विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला.
या उपक्रमाचा गावकरी व पालक वर्गाकडून कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा