Breaking

शनिवार, २९ जानेवारी, २०२२

*अकिवाट मध्ये वीर सेवा दला तर्फे १ फेब्रुवारी रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन*

 

अकिवाट येथे मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन


*प्रा.अमोल सुंके  : अकिवाट प्रतिनिधी*


अकिवाट  : सध्या थंडी आणि वातावरणातील अचानक बदलामुळे छोट्या-मोठ्या आजारांनी डोकं वर काढलंय. हेच विचारात घेऊन वीर सेवा दल ,अकिवाट शाखेच्या वतीने विशाळी निम्मित मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या मध्ये जनरल चेकअप बरोबरच हृदय विकार, डोळ्यांचे विकार, कान ,नाक ,घसा ,पोटाचे विकार आणि इतर आजारांवर तज्ञ डॉक्टर्स येणार आहेत आणि मोफत तपासणी आणि सुविधा दिले जाणार आहे. शिबिरात सर्व रोगांचे निदान मोफत केले जाणार आहे. शिबिरात मोफत ECG सुविधा सुद्धा पुरवली जाणार आहे.

       या उपक्रमास नारायणी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल इचलकरंजी, श्री साई हार्ट केअर सेन्टर सांगली,  कृष्णा स्पीच अँड हिअरिंग क्लीनिक जयसिंगपूर या रुग्णालयांचे सौजन्य लाभले आहे. या बदलत्या वातावरणाच्या आणि आजारांच्या काळात नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन वीर सेवा दलाच्या अकिवाट शाखेतर्फे करण्यात आले आहे. १ फेब्रुवारी,२०२२ रोजी सकाळी ११ ते दुपारी ४.०० या वेळेत श्री विद्यासागर हायस्कूल, अकिवाट येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा