Breaking

मंगळवार, १ फेब्रुवारी, २०२२

*सन २०२२ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर : कोणत्या वस्तू स्वस्त व महाग?*


सन 2022 चा अर्थसंकल्प सादर


  दिल्ली :  सन २०२२ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला या अर्थसंकल्पकडे देशातील प्रत्येक घटकाचे लक्ष लागून राहिलं होतं. प्रत्येक घटक आपापल्या पद्धतीने अर्थसंकल्पाचा आपणास नेमका फायदा काय? तोटा काय? याचा विचार साकल्याने करीत असतो. मात्र सामान्यांच्या दृष्टीने काय स्वस्त झालं आणि काय महागलं, याचीच चर्चा मोठ्या प्रमाणात होताना दिसत असते. यंदाचा अर्थसंकल्प सीतारमण यांनी संसदेत नुकताच मांडला आहे. त्यातून कोणत्या वस्तू स्वस्त आणि महाग याबद्दल आपण माहिती घेऊ


या वस्तू झाल्या स्वस्त


१) कपडे, चामड्याचा वस्तू

२) इलेक्ट्रॉनिक्स वस्तू

३) मोबाईल फोन, चार्जर

४) हिऱ्याच्या वस्तू, दागिने

५) शेतीची अवजारे

६) कॅमेरा लेन्सेस

७) इम्पोर्टेड केमिकल


   या वस्तू झाल्या महाग


१) क्रिप्टो करन्सीमधील गुंतवणूक महाग


अन्य महत्त्वाच्या घोषणा


      स्टार्टअपसाठी विद्यमान कर लाभ ज्यांना सलग 3 वर्षांसाठी करांची पूर्तता करण्यात आली होती ते आणखी 1 वर्षाने वाढवले ​​जातील.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या NPS खात्यात नियोक्त्याच्या योगदानावरील कर कपातीची मर्यादा 14% पर्यंत वाढलीः


क्रिप्टो चलनावर एक टक्का टीडीएस आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर 30 टक्के कर


सहकारी संस्थांच्या कराचा दर 18 टक्के करण्यात आला आहे. तो 15 टक्के करण्याचा आणि अधिभार 12 टक्क्यांवरून 7 टक्के करण्याचा प्रस्ताव आहे.


सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये करमाफीचा प्रस्ताव.


दिव्यांगांच्या पालकांना करात सूट मिळणार आहे.


आयटीआर त्रुटी सुधारण्यासाठी दोन वर्षांसाठी परवानगी


ब्लॉकचेन आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल चलन सादर केले जाईल


रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया २०२२-२३ मध्ये डिजिटल चलन सुरू करणार आहे.


2022 ते 23 मध्ये आरबीआयचं डिजिटल चलन येणार आहे. या डिजिटल चलनामुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.


 राज्यांच्या भांडवली गुंतवणुकीसाठी १ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या घोषणेमुळे आभासी चलनांमा मान्यता मिळण्याची शक्यता कमी झालेली आहे


आरबीआयकडून डिजिटल रुपया येणार आहे”, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी दिली आहे.


गावागावात ब्राॅडबॅण्ड सुविधा उभी करणार आहे. त्याचबरोबर लवकरच 5G ची सुरू करण्यात येणार आहे. तसेच पोस्ट ऑफिसमध्ये एटीएमची सुविधा देण्यात येणार आहे. आणि


 पासपोर्टमध्ये ई-चीप बसविण्यात येणार आहे. 5G योजनेतून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे”, अशीही माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी दिली.


केंद्रीय अर्थसंकल्प २०२२ मांडताना निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबद्दल मत व्यक्त वित्तमंत्र्यांनी असं सांगितलं की, “शालेय शिक्षणासाठी १०० टीव्ही चॅनेल्स सुरू करणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना स्थानिक भाषेत शिकण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या रेडिओ आणि टीव्ही चॅनेल्सद्वारे डिजीटल शिक्षणावर भर देण्यात येणार आहे. अंगणवाड्या सक्षम करण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार आहे”, अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमन यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा