संशयित आरोपी दिबु प्रकाश स्वेन,ओरिसा |
दिल्ली : १० राज्यात प्रेम प्रकरण, तब्बल २७ उच्चपदस्थ महिला सोबत लग्न एक-दोन नाही तर तब्बल २७ वेळा लग्न करून फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
ओडिशा पोलिसांनी एका ६० वर्षीय व्यक्तीला अटक केली असून त्याने तब्बल दहा राज्यातील २७ महिलांसोबत लग्न केल्याचे उघड झाले आले. तसेच या महिलांकडून पैसे देखील उकळले असल्याचे माहिती समोर आली आहे. दिबु प्रकाश स्वेन असे आरोपीचे नाव असून तो ओडिशातील केंद्रपाडा जिल्ह्यातील पाटपुरा येथील रहिवाशी आहे.
१० राज्यातील २७ महिलांशी लग्न केलं २००६ मध्ये केरळ मधील १३ बँकांचे १२८ बनावट क्रेडिट कार्डद्वारे एक कोटी रुपयांची फसवणूक केले होती. हैदराबाद मध्ये त्याने मुलांना एमबीबीएस जागा मिळवून देण्याच्या नावाखाली लोकांची दोन कोटीची फसवणूक केली, इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांच्या सहाय्यक कमांडो पासून ते छत्तीसगड अकाउंटंट ,दिल्लीतील शाळेतील शिक्षक, तेजपुर येथील डॉक्टर ,सर्वोच्च न्यायालयाचे वकील,दिल्ली उच्च न्यायालयाचे दोन वकील,इंदूर येथील सरकारी कर्मचारी, केरळ प्रशासकीय उच्चपदस्थ महिलांसोबत लग्न केलं होतं यासाठी त्यांनी जीवनसाथी डॉट कॉम ,शादी डॉट कॉम आणि भारत मॅट्रिमोनी डॉट कॉम साईटचा वापर केला होता. मी स्वतः प्राध्यापक असल्याचं सांगितलं होतं तसेच त्याने आरोग्य शिक्षण संचालक हे स्वतःच्या प्रोफाईल मध्ये लिहिलं होतं तसं सांगितलं आहे.
या राष्ट्रीय महाठगाने अशा पद्धतीने उच्च पदस्थ महिला व लोकांची फसवणूक केल्याने एकच खळबळ माजली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा