जळगाव येथे एका विवाहित महिलेची हत्या |
जळगाव : राज्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील विष्णू नगर (गाळण) येथे सौ मनिषा चेतन राठोड (वय वर्ष २४) या विवाहितेच्या मृत्यूच्या कारणाचा शवविच्छेदनानंतर उलगडा झाला आहे. मनीषा राठोड यांचा दोरीने गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे मृताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. मृत्यूचा बनाव केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
पाचोरा तालुक्यातील विष्णू नगर येथे कुंडाणे तांडा येथील माहेर असलेल्या मनीषा राठोड हिचा ४ फेब्रुवारीला रात्री संशयास्पद मृत्यू झाला होता. सासरच्या मंडळींनी तिचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची बतावणी केल्याने पाचोरा पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
मात्र, मनीषाच्या गळ्यावर दोरी आवळ्याच्या व नखे लागल्याच्या खुणा आढळल्याने तिचा भाऊ ज्ञानेश्वर जगन्नाथ पवार याने मनीषाचे शवविच्छेदन पाचोरा येथे न करता ते जळगाव इन कॅमेरा करण्याची मागणी केली होती. दरम्यान, तिच्या पश्चात ९ महिन्यांचा यश नावाचा मुलगा आहे. त्यास पती चेतन राठोड याच्याकडे सोपवण्यात आले आहे.
या, धक्कादायक घटनेची परिसरात एकच खळबळ माजली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा