Breaking

मंगळवार, १ फेब्रुवारी, २०२२

*विठ्ठलाच्या पंढरीत जयसिंगपूरातील महिलेची आत्महत्या*


जयसिंगपूरातील महिलेची पंढपुरात आत्महत्या


*प्रविणकुमार माने  :  उपसंपादक*


     जयसिंगपूर : पंढरपूर येथील श्री विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेल्या जयसिंगपूर येथील एका महिलेने पंढरपूर नगरपालिकेच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

       मयत शैलजा शहापुरे, वय वर्ष ३६ रा. जयसिंगपुर ता. शिरोळ असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. सदर घटनास्थळी नागरिकांची प्रचंड गर्दी होती. पोलिसांच्या पंचनामा तपासात सदर महिला मानसिक आजाराने त्रस्त असल्याने तिने इमारतीवरून उडी मारली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मृत शैलजा शहापुरे हिच्या कुटुंबीयांशी पोलिसांनी तातडीने संपर्क साधला असता मागील काही वर्षांपासून ती मानसिक आजारी असल्याची माहिती त्यांनी दिली. तिच्यावर सांगली येथील मानसोपचारतज्ज्ञांकडे उपचारदेखील सुरु होते. 

        अधिकृत सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सदर मयत महिला ही विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी ती पंढरीत आली होती. यावेळी तिने नगरपालिका शॉपिंग सेंटरमधील एका सोनाराच्या दुकानात जाऊन आल्याची माहिती मिळाली. यानंतर नगरपालिकेच्या इमारतीचे शटर उघडे दिसल्याने तिने तिसऱ्या मजल्यावर प्रवेश करून येथील कठड्यावरून तिने कोणाला काही समजण्या अगोदरच थेट उडी मारली. त्यात ती गंभीररित्या जखमी झाली होती. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना उपचारादरम्यान मृत्यू झाला.  आत्महत्येचे नेमके  कारण समजू शकले नाही. शवविच्छेदनानंतर  मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा