Breaking

बुधवार, २ फेब्रुवारी, २०२२

*रूकडी मध्ये उधारीच्या मागणीवरून कोयत्याने जीवघेणा हल्ला : परेरा दांपत्य जखमी*

 

रूकडी येथे परेरा  दांपत्यवर जीवघेणा हल्ला

*प्रविणकुमार माने :  उपसंपादक*


    कोल्हापूर जिल्ह्याच्या रुकडी गावात किराणा मालाच्या दुकानाची उधारी मागण्यासाठी गेले असता परेरा पती-पत्नीवर कोयत्याने हल्ला करून जखमी केल्याप्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

     याबाबत अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील गावांमध्ये राजेश परेरा यांचे किराणा मालाचे दुकान आहे.काही वर्षांपासून ते रूकडी गावामध्ये आपला व्यवसाय चालवीत आहेत. रोख व्यवहारा बरोबर लोकांशी उधारीचे व्यवहारी चालतात. मात्र रुकडी गावातील राजश्री चौगुले यांना त्यांनी ४५००/ रुपयाचा किराणामाल उधारीवर दिला होता. पण गेल्या काही दिवसांपासून उधारी देत नसल्यामुळे त्यांच्या घरी वसुलीसाठी गेले होते. उधारी बाकी असून लवकरात लवकर पैसे द्या अशी मागणी केली असता राजश्री चौगुले व त्यांचे दीर नवनाथ यांनी आता आमच्याकडे पैसे नाहीत नंतर देतो असे सांगितले. त्यानंतर परेरा यांनी माझी परिस्थिती बिकट आहे मला खरेदी करण्यासाठी पैसे हवेत असे सांगितले या तिघांमध्ये जोरदार वाद झाला आणि वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. दुकानदार परेरा व त्यांची पत्नी यांच्यावर राजश्री चौगुले व त्यांचे दीर नवनाथ यांनी कोयत्याने हल्ला केला यामध्ये परेरा दांपत्य जखमी झाले. त्यांच्या पत्नीच्या हातावर वार करण्यात आला तर परेराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यावेळी गावातील काही नागरिकांनी या जखमींना रुग्णालयात दाखल केले त्यानंतर याची माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन गावांमध्ये शांततेचे आवाहन केलं.

    यानंतर पोलिसांनी राजेश परेरा यांची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला असून हातकणंगले पोलिस सखोल तपास करीत आहेत. या घटनेने मात्र सुकडी परिसरात संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा