मिरज येथे तीन पाणी जुगार अड्ड्यावर तुंबळ हाणामारी |
*प्रविणकुमार माने : उपसंपादक*
मिरज मध्ये तीन पाणी जुगार अड्ड्यावर फिल्मी स्टाईल तुंबळ हाणामारी झाली असून यामध्ये दोघांवर खुनी हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये दोघे गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे.
मिरज शहरातील अक्षय हॉटेल जवळ तीन पाणी जुगार जोरात सुरू आहे. कोयता,खुरपे, फायटर व बेंगलोरी कौलांचा वापर करून तुफान हाणामारी झाली आहे.यामध्ये दोन तरुण जखमी असून त्यापैकी रवि घाटगे व ओंकार मगदूम अशी जखम झालेल्या तरुणांची नावे आहेत.
या अड्ड्यावर तीन पाणी जुगार जोरात सुरू असून सांगली व आसपासच्या भागातील तरुण जुगार खेळण्यासाठी येत असतात.त्यावेळी मिरज शहरातील काही तरुणांसोबत जोरदार वादावादी झाली त्यानंतर संबंधित तरुणांनी ख्वाजा वसाहतीतील तरुणांना बोलावून घेतले. या ठिकाणी तुफान हाणामारी झाली यामध्ये दोघे गंभीर जखमी असून एकावर सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तर एकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मात्र याबाबत पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली नव्हती.एका रिक्षाच्या आर्थिक व्यवहारातून सदर हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या घटनेने पुन्हा एकदा तीन पाणी जुगार सुरू असल्याचं कळत आहे. मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे तेथील नागरिकांकडून उघडपणे बोलले जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा