Breaking

बुधवार, ९ फेब्रुवारी, २०२२

*कोल्हापूरच्या 'साम्राज्य मराठे’ या पावणेदोन वर्षांच्या बालकाने महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई केले पादाक्रांत*

 

पावणे दोन वर्षाच्या बालकांना सर केले कळसुबाई शिखर


कोल्हापूर  : कोल्हापूर जिल्ह्यातील ‘साम्राज्य मराठे’ या पावणेदोन वर्षांच्या लहान बालकाने आपल्‍या पालकांसाेबत कळसुबाई शिखर पादाक्रांत करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. या बालकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

      सह्याद्री पर्वत रांगेतील सर्वांधिक उंचीचे कळसुबाई हे शिखर आहे. त्यामुळे हे शिखर सर करण्याचे स्वप्न प्रत्येक ट्रेकर्सचं असतं. पण लहान बालका विषयी हे आव्हान म्हणजे थट्टा करण्यासारखे आहे. आपल्याला ही गोष्ट न पटण्यासारखी किंवा चित्रपटात चित्रित केलेल्या काल्पनिक गोष्टी सारखी आहे. पण वाचकांनो ही स्वप्नवत गोष्ट प्रत्यक्षात सत्यात उतरविणारा कोल्हापूरचा पावणे दोन वर्षांचा साम्राज्य नामक बालक आहे.

         शिखर सर करण्याचा घटनाक्रम असा होता की, पहाटे ‘साम्राज्य’ बारी गावात पोहोचला तेव्हा हे शिखर ढगाच्या आडून लपंडाव खेळत होते. अशा वातावरणात छोट्या साम्राज्यने सकाळी ७.२० वाजता भंडारदऱ्यातील बारी गावातून शिखराच्या दिशेने पालकांसाेबत आपली छोटी छोटी पावले टाकायला सुरुवात केली. दुपारी १२.४८ वाजता कळसूबाईच्या मंदिराजवळ तो पोहचला.

साम्राज्यचे वडिल इंद्रजीत मराठे म्हणाले, माझ्या मुलाने केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. पुढेही त्याने अशीच प्रगती करावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केले. यावेळी आठ वर्षांच्या जान्हवी पाटील हिनेही कळसूबाई शिखर सर केले. विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि इंद्रजित मराठे, सायली मराठे, अवधूत पाटील प्रोत्साहनातून साम्राज्यने ही कल्पनाच्या पलिकडील कसोटी.व कामगिरी यशस्वीपणे पूर्ण केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा