Breaking

गुरुवार, १० फेब्रुवारी, २०२२

महिलांची सुरक्षा ही संपूर्ण समाजाची जबाबदारी - श्रीमती तनुजा शिपूरकर,


तनुजा शिरपुरकर

 रूकडी : आज स्त्रिया सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत, परंतु अजूनही स्त्रियांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला नाही.महिला ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणचे वातावरण निकोप असायला पाहिजे पण काही वेळेस कामाच्या ठिकाणी स्त्रियांना अन्याय सहन करावा लागतो. घरातील स्त्रियांना सुद्धा अन्याय-अत्याचार सहन करावा लागतो, सार्वजनिक ठिकाणी महिला सुरक्षित नाहीत स्त्रीला माणूस म्हणून समाजात स्थान मिळाले पाहिजे, प्रत्येक ठिकाणी महिलांना सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने महिलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घ्यायला पाहिजे असे मत कोल्हापूर जिल्हा महिला दक्षता समितीच्या सदस्या श्रीमती तनुजा शिपूरकर यांनी व्यक्त्त केले त्या येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत आयोजित केलेल्या आॕनलाईन कार्यशाळेत " महिलांवरील अत्याचार व आपली जबाबदारी " या विषयावर बोलत होत्या.

      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ. प्रशांतकुमार कांबळे होते. स्वागत व प्रास्तविक डाॕ.शर्मिला साबळे यांनी केले.   दुसऱ्या सत्रात शहाजी लॉ कॉलेज कोल्हापूरच्या डॉ. सविता रासम यांनी " लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदे " या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी त्या म्हणाल्या, कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी पीडित व्यक्त्तीने तक्रार दिली पाहिजे, पण बऱ्याच वेळा पिडीत व्यक्त्ती तक्रार देत नाही त्यामुळे गुन्हा करणारी व्यक्त्ती समाजात वावरताना दिसून येते. दोषी व्यक्त्तीला वेळीच शिक्षा झाली तर इतर व्यक्त्ती असे गुन्हे करण्याचे धाडस करणार नाही.

   अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डाॕ.प्रशांतकुमार कांबळे म्हणाले आपल्या भारतीय संस्कृतीत स्त्रीयांना मानाचे स्थान आहे, आज स्त्रीया शिक्षण घेवून नोकरी,व्यवसाय सांभाळत आहेत.समाजातील प्रत्येक घटकाने स्त्रीयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून स्त्रीयांकडे सन्मानाने पाहिले पाहिजे. आभार डाॕ.लता मोरे यांनी मानले तर सूत्रसंचालन डाॕ.अशोक पाटील यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा