कोल्हापुरात ई- बाईकसनी घेतला पेट |
*हेमंत कांबळे : कोल्हापूर शहर प्रतिनिधी*
कोल्हापूर : विक्रीसाठी आणलेल्या इलेक्ट्रिक दुचाकी एका इमारतीच्या तळमजल्यावर पार्किंग केल्या होत्या. इलेक्ट्रिक मोटारीतील बॅटरीने पेट घेतला आणि एकापाठोपाठ एक सुमारे आठ दुचाकी जळून खाक झाल्या.आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण तरीही आगीमध्ये आठ वाहनांची सुमारे साडेसहा लाख रुपयांचे नुकसान झालं.
अशी घडली घटना :
कोल्हापुरातील नागाळा पार्क परिसरातील अक्षय पार्क प्राइम रोज या सहा मजली इमारतीत प्रदीप जाधव राहतात. त्यांच्या मालकीची शाहूपुरी तिसरी गल्लीत ई- बाइकची शोरूम आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांच्याकडे प्रत्येकी ८० हजार रुपयांच्या नव्या १२ दुचाकी आल्या. या गाड्या लावण्यासाठी शोरूम मध्ये जागा नसल्याने त्यांनी आठ ई- बाईक आपल्या अपार्टमेंटच्या तळमजल्यावर ठेवल्या होत्या. आज दुपारी उन्हाच्या तडाख्याने त्यातील एका दुचाकी मधील बॅटरीने पेट घेतला त्यातून बॅटरीचा स्पोर्ट झाला आणि बाजूच्या आठ दुचाकीने पेट घेतला.
दरम्यान तळमजल्यावर खेळत असलेल्या मुलांनी आगीबाबत बालकांना सांगितलं. अपार्टमेंटमधील लोकांनी तातडीने धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत आग भडकली होती धुराचे लोट अक्षरशः गगनाला भिडले होते. रहिवाशांनी प्रचंड प्रयत्न करून आग विझवली मात्र तोवर आठ वाहनांचा सुमारे साडेसहा लाखांचे नुकसान झालं.
या घटनेने परिसरात हाहाकार माजला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा