Breaking

सोमवार, १४ फेब्रुवारी, २०२२

*शिक्षणातून लोकसेवा व लोकसेवेतून शिक्षण हे ध्येय अंगिकारले पाहिजे : संचालक प्रा.अभय जायभाये*


जयसिंगपूर कॉलेज,NSS ला भेट देऊन मार्गदर्शन करताना प्रा.अभय जायभाये, संचालक ,रासेयो, कोल्हापूर


*मालोजीराव माने : कार्यकारी संपादक*


जयसिंगपूर  :  शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या वतीने  महाविद्यालयीन राष्ट्रीय सेवा योजना एकक कार्यालयास पाहणी दौरे सुरू आहेत. गुरुवार दि.१०/०२/२०२२ रोजी जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूरच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या एककास भेट दिली. यावेळी संचालक प्रा.अभय जायभाये, डॉ.संतोष जेठीथोर व डॉ.माधव मुंडकर हे मान्यवर उपस्थित होते.

    सुरुवातीस प्रा.अभय जायभाये यांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजना झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले.शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक प्रा.अभय जायभाये, विद्यापीठ सल्लागार समिती सदस्य डॉ. संतोष जेठीथोर व इचलकरंजी व जयसिंगपूर विभागाचे प्रमुख डॉ.माधव मुंडकर हे मान्यवर उपस्थित होते. मा प्राचार्य डॉ.सौ मनिषा काळे यांच्या हस्ते प्रा. जायभाये व इतर मान्यवर घटकांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व कागदपत्रांची पाहणी केली.

     त्यानंतर कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.प्रभाकर माने यांनी मान्यवरांचे स्वागत करुन कार्यक्रम आयोजनाचा हेतू स्पष्ट केला. एन.एस.एस स्वयंसेवक विद्यार्थी प्रमुख श्री. विक्रम माळी यांनी देशभक्तीपर गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

     'जबरदस्तीत कसली मर्दानगी' या उपक्रमाचं पारितोषिक वितरण प्रा.अभय जायभाये यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी संग्राम संस्थेच्या सौ.कविता सपकाळ व सौ.होवाळ मॅडम उपस्थित होत्या.


     सुरुवातीस राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक प्रा.अभय जायभाये  विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन करताना म्हणाले, कोरोना महामारी च्या काळात संपूर्ण जगात कोराना नामक सर्वात मोठी आपत्ती आली. मात्र जीवाची परवा न करता देशभक्ती व समाजसेवा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून  राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या भूमिकेतून काम करीत कोरोना महामारीला अटकाव करण्याचा प्रयत्न केला. यासाठी कोणता पुरस्कार नाही किंवा मानधन ही नव्हते. परंतु "मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा" या वाक्याला परिपूर्ण होईल अशा प्रकारचं कार्य व कृती तुमच्यासारख्या विद्यार्थ्याकडून घडली. मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी नी  एन.एस.एस चे कौतुक केले. यापुढे म्हणाले , आपणास 'शिक्षणातून लोकसेवा व लोकसेवेतून शिक्षण' हे ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेवून काम करावयाचे आहे. याप्रसंगी त्यांनी जयसिंगपूर कॉलेज राष्ट्रीय सेवा योजनेच्या रचनात्मक उपक्रमाचे मनापासून कौतुक व अभिनंदन केले.

      विद्यापीठ सल्लागार समिती सदस्य डॉ. संतोष जेठीथोर मनोगतात म्हणाले, एन.एस.एस व एनसीसी हे राष्ट्रीय विद्यार्थी संघटन महाविद्यालय किंबहुना राष्ट्राचे मजबूत स्तंभ आहेत. देशाचा खरे भवितव्य यावर अवलंबून असते त्यामुळे ते संघटन मजबूत होण्यासाठी आपण कृतिशील मार्गाचा,प्रगल्भ विचारांचा व पुरोगामी मार्गाचा अवलंब करावा असे ते म्हणाले.

     इचलकरंजी व जयसिंगपूर विभागाचे प्रमुख डॉ.माधव मुंडकर म्हणाले, जयसिंगपूर कॉलेज राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी समाजासमोर एक आदर्शवत रचनात्मक उपक्रमांची व्यवस्था उभी केली आहे.

       यानंतर विद्यार्थ्यांच्या मध्ये सुसंवाद साधत एन एस एस संघटन मजबूत होण्यासाठी विद्यार्थ्याकडून काही सूचना मागितल्या. विद्यार्थ्यांनी प्रतिसाद देत काही कृतिशील सूचनाही सांगितल्या.

      जयसिंगपूर कॉलेज राष्ट्रीय सेवा योजनेत बाबतचा संक्षिप्त अहवाल जीवन आवळे यांनी मांडला. या औपचारिक कार्यक्रमाचं आभार प्रा. मेहबूब मुजावर यांनी मानले. या कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे असंख्य स्वयंसेवक विद्यार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा