Breaking

मंगळवार, १ फेब्रुवारी, २०२२

*प्रसिद्ध राजाभाऊ भेलचे मालक रविंद्र शिंदे यांच्यावर प्राण घातक हल्ला*

 

राजाभाऊ भेळचे मालक शिंदे यांच्यावर प्राणघातक हल्ला

*हेमंत कांबळे  : कोल्हापूर शहर प्रतिनिधी*


 कोल्हापूर  : येथील खासबाग मैदान परिसरातील प्रसिद्ध राजाभाऊ भेळचे मालक रवींद्र शिंदे यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा प्रकार मंगळ्वार सायंकाळी घडला.


     मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री काही तरुण राजाभाऊ भेळ येथे भेळ घेण्यासाठी आले होते. त्यातील एकाने पान खाऊन दुकानासमोरच थुंकला. यावेळी रवींद्र शिंदे व त्यांच्या सहकार्‍यांनी त्याला हटवण्याचा प्रयत्न केला. यातून चिडून त्या तरुणाने शिंदे यांच्यासोबत वाद घातला होता. मंगळवारी दुपारी संबंधित तरुण तीन साथीदारांसह राजाभाऊ भेळसमोर आला. सोमवारी रात्री झालेल्या प्रकाराचा जाब विचारत तो पुन्हा रविंद्र शिंदे यांच्या अंगावर धावून गेला. तसेच सोबत आणलेले धारदार हत्यार त्यांच्यावर उगारले. हा प्रकार पाहणारे राजाभाऊ भेळमधील काही कर्मचारी, आसपास जमलेले नागरिक धावत त्या ठिकाणी आले. त्यांनी तरुणांच्या हातातील हत्यार हिसकावून तिघांना चोप दिला. तर एक जण पसार झाला. प्रकार पाहणाऱ्या जमावाने तिघा हल्लेखोरांना चोप देत पोलिसांच्या हवाली केले. सोमवारी रात्री झालेल्या किरकोळ वादानंतर आज पुन्हा हा प्रकार घडला.

    या घटनेने परिसरात संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा