स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तीव्र आंदोलन |
कोल्हापूर : येथील महावितरण कार्यालयासमोर गेली दोन दिवस स्वाभिमानी शेतकरी संघटेनेचे प्रमुख राजू शेट्टी यांचे धरणे आंदोलन सुरू होते. त्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कागल येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता कार्यालय पेटवले.
छत्रपती शाहू साखर कारखान्याच्या अग्निशमन यंत्रणेच्या मदतीने महावितरणकडून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. आज आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटण्याची शक्यता असल्याचे कार्यकर्त्यांना सांगण्यात येत आहे.
राज्य शासनाची शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबतची अनास्था व प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष याचा परिणाम म्हणून अशा प्रकारची घटना घडल्या बाबत बोलले जात आहे. प्रशासनाचा बेजबाबदार व निष्काळजीपणाचा परिणाम असल्याबाबतची तीव्र प्रतिक्रिया समस्त शेतकरी वर्गाकडून दिली जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा