मयत दीपक वसगडे,कोथळी |
*जीवन आवळे : कोथळी प्रतिनिधी*
कोथळी : शिरोळ तालुक्यातील कोथळी याठिकाणी एका तरूणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. दिपक महावीर वसगडे वय वर्ष ३४ रा.आदर्श विद्यालय कोथळी जवळ असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सदरची घटना २३ फेब्रुवारी २०२२ रोजी, रात्री ११.०० ते २४ फेब्रुवारी,२०२२ सकाळी ६.०० वाजण्याच्या दरम्यान घडली असल्याची शक्यता आहे. याबाबत विजय जिनाप्पा वसगडे वय वर्ष ५५ रा.कोथळी यांनी जयसिंगपूर पोलिसा मध्ये वर्दी दिली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, या घटनेतील मयत तरुण दिपक वसगडे याने आपल्या राहत्या घराच्या बेड रूम मधील लोखंडी खिडकीला असलेल्या लोखंडी बारला नायलॉनची दोरी बांधून गळफास लावून आत्महत्या केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी करून पंचनामा केला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र जयसिंगपूर मध्ये शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. सदर घटनेचा पुढील तपास जयसिंगपूर पोलीस करीत आहेत.
या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा