Breaking

शुक्रवार, ११ फेब्रुवारी, २०२२

*शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक प्रा.अभय जायभाये यांचे कॉलेज रासेयो एककास पाहणी भेट दौरे सुरू*

 

अभ्यास दौऱ्यात सहभागी संचालक, सल्लागार व पदाधिकारी


*मालोजीराव माने : कार्यकारी संपादक*


जयसिंगपूर  :  शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या वतीने ३१ मार्च, २०२२ पर्यंत विद्यापीठ रासेयो रासेयो संचालक,सल्लागार समिती सदस्य यांचेसह रासेयो कक्षातील पदाधिकाऱ्यांनी महाविद्यालयीन राष्ट्रीय सेवा योजना एकक कार्यालयास पाहणी दौरे सुरू केले आहेत. गुरुवार दि.१०/०२/२०२२ रोजी इचलकरंजी व जयसिंगपूर विभागातील एस.के.पाटील महाविद्यालय कुरुंदवाड, घोडावत कन्या कॉलेज जयसिंगपूर, डॉ.जे.जे.मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग व जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूरच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या एककास भेट दिली.

    शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक प्रा.अभय जायभाये, विद्यापीठ सल्लागार समिती सदस्य डॉ. संतोष जेठीथोर व इचलकरंजी व जयसिंगपूर विभागाचे प्रमुख डॉ.माधव मुंडकर यांनी राष्ट्रीय सेवा योजना एकक सक्षम करण्यासाठी या भेटी दिल्या. या भेटी दरम्यान खालील बाबी तपासण्यात आल्या.


1. माझी वसुंधरा अभियान, माझे गाव कोरोनामुक्त गाव, लसीकरण मतदार नोंदणी व जनजागृती, रक्तदान शिबीर, महापुरामध्ये केलेले उल्लेखनिय कार्ये यांबाबत संक्षिप्त माहिती

2. आझादी का अमृत महोत्सव उपक्रमाअंतर्गत राबविलेले कार्यक्रमांचा संक्षिप्त अहवाल 

3. गतवर्षीचा मराठी व इंग्रजी भाषेतील वार्षिक अहवाल व चालू शैक्षणिक वर्षातील प्रस्तावित कृती आराखडा 

4. रासेयो सुवर्णमहोत्सव वर्षानिमित्त तयार करावयाच्या पुस्तिकाकरीता आवश्यक माहिती

5. रासेयो नाविन्यपूर्ण उपक्रम व रासेयो एकक यशस्वी कथा

6. वरील सर्व उपक्रमासह विद्यापीठ रासेयो विभागाद्वारे पाठविणेत आलेल्या पत्रान्वये विविध उपक्रमांचा जास्तीत जास्त सहभाग

7. स्टॉक, डेडस्टॉक रजिस्टर व प्रत्यक्ष उपलब्ध साहित्य

8. मागील वर्षाचे नियमित कार्यक्रमाचे वार्षिक लेखे

9.सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली नोंदणी स्थिती रासेयोच्या दृष्टीनेआवश्यक इतर बाबी      

     वरीलप्रमाणे नमूद बाबींची प्रत्यक्ष पडताळणी केली व  ज्या बाबींची अपूर्णता आहे त्या बाबीची पुर्तता तातडीने करण्याचे कडक आवाहन केले. तसेच ज्या युनिटने उत्तम कामगिरी केली आहे त्यांचं कौतुक केलं.

     शिवाजी विद्यापीठ रासेयो कक्षाकडून राष्ट्रीय सेवा योजना युनिट सक्षम करण्यासाठी पाहणी भेट दौऱ्याचे  महाविद्यालयीन स्तरावर संबंधित कॉलेजच्या प्राचार्यांकडून स्वागत करण्यात आले. संबंधित कॉलेजच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांनी उत्तम सहकार्य केले. यामध्ये कार्यक्रम अधिकारी, प्रा.डॉ. गौतम ढाले,प्रा.डॉ. दिपक सुर्यवंशी,प्रा.प्रकाश चौगुले व डॉ.प्रभाकर माने सहभागी होते.

     संचालक ,प्रा.अभय जायभाये यांनी अशाप्रकारची पाहणी भेट दौरे शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील संलग्नित महाविद्यालयात होणार आहे तरी संबंधित कार्यक्रम अधिकारी यांनी उत्तम पूर्वतयारी करून सहकार्य करण्याबाबत आवाहन केले.

२ टिप्पण्या:

  1. सर खुप छान आयोजन... सर्व कॉलेज मार्फ़त करण्यात आले होते सर्वांचे खूप खूप अभिनंदन.....

    उत्तर द्याहटवा
  2. विद्यापीठातील NSS कार्यक्रम अधिकारी यांनी अशा भेटी वारंवार देऊन कॉलेजच्याा NSS विभागाना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत.

    उत्तर द्याहटवा