कु.माधुरी कोळी अर्थशास्त्र विषयातून सेट |
*प्रा.डॉ. महावीर बुरसे : विशेष प्रतिनिधी*
शिरोळ: विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात (UGC)संलग्नित सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे आयोजित 'सहाय्यक प्राध्यापक पात्रता परीक्षा" कु. माधुरी शशिकांत कोळी या अर्थशास्त्र विषयातून सेट परीक्षा उत्तीर्ण झाली आहे.
माधुरी कोळी हिचा शैक्षणिक प्रगतीची प्रवास बी.ए. पदवी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून संपादन व पदव्युत्तर पदवी जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर येथून त्यांनी पूर्ण केली. कॉलेजमधील एक प्रामाणिक,अभ्यासू विद्यार्थिनी व संशोधनात्मक कार्यावर तिचा अधिक जोर राहिला आहे. विद्यार्थिदशेत असतानाच त्यांचे संशोधन पेपर प्रकाशित झाले होते. सातत्याने अर्थशास्त्रीय विषयांशी नाळ जोडत अभ्यासाचा व्यासंग त्यांनी वाढविला. ध्येयनिष्ठ उराशी बाळगून जिद्द,चिकाटी व कष्टप्रद अभ्यासाचा परिणाम म्हणूनच त्या सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्या. यासाठी त्यांना अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. प्रभाकर माने, प्रा.डॉ.व्ही.बी.देवकर व प्रा. एस.व्ही.बस्तवाडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर वडील शशिकांत कोळी व आई सौ.मनिषा कोळी यांनी उत्तम साथ दिली. सध्या हॅप्पी इंग्लिश स्कूल येथे सेवेत कार्यरत आहेत. सातत्याने विविध शैक्षणिक नवोउपक्रम राबविणे हा त्यांचा एक स्थायी भाव बनला आहे.
त्यांच्या या सुयशात स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे, सचिव डॉ. महावीर अक्कोळे,सर्व संस्था पदाधिकारी व प्राचार्य डॉ.सौ. मनिषा काळे या सर्व मान्यवर घटकांकडून उत्तम सहकार्य मिळाले.
शिरोळच्या या सुकन्येने मिळविलेल्या यशाचे सर्वत्र कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अभिनंदन
उत्तर द्याहटवा