Breaking

शनिवार, १२ फेब्रुवारी, २०२२

*संभाजीपुर मधील २५ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन केली आत्महत्या*

 



मयत अनिकेत मोरे, संभाजीपूर

प्रविणकुमार माने : उपसंपादक

जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील संभाजीपुर येथील कचरे हौसिंग सोसायटीतील २५ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सदर घटना  १२ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अनिकेत अप्पासाहेब मोरे (वय वर्ष २५) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

       याबाबत विशाल शंकर पवार  संभाजीपुर (ग्रामपंचायत सदस्य)यांनी जयसिंगपूर पोलिसांमध्ये वर्दी दिली आहे. पोलिसांनी सीआरपीसी कलम १७४ प्रमाणे या घटनेची नोंद केली आहे.

    याबाबत अधिकृत सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, १२ फेब्रुवारी रोजी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास मयत अनिकेत मोरे याने राहत्या घरी सिलिंग फॅनला बेडशीटने गळ्याला बांधून गळफास लावून घेऊन आत्महत्या केली आहे. जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेचा पुढील तपास जयसिंगपूर पोलीस करीत आहेत.

      आत्महत्या केलेल्या या घटनेने संभाजीपूर शोककळा पसरली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा