आमदार नितेश राणे मेडिकल चेकअप साठी कोल्हापुरात |
*हेमंत कांबळे : कोल्हापूर शहर प्रतिनिधी*
कोल्हापूर : संतोष परब यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी सिंधुदुर्ग पोलिसांनी आमदार नितेश राणे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांना अटक केली आहे.
आमदार नितेश राणे यांची कोल्हापुर येथील छत्रपती प्रमिला राजे शासकीय रुग्णालय (सीपीआर) वैद्यकीय तपासणी होणार आहे. साधारणत: चार वाजता राणे यांना पोलीस बंदोबस्तात येथे आणण्यात येईल या पार्श्वभूमीवर शासकीय रुग्णालयाच्या आवारात पोलिसांचा मोठा फौजफाटा पाचारण करण्यात आला आहे. हल्ला प्रकरणी आमदार राणे यांना तीन दिवसापूर्वी अटक झाली होती. दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्यांना न्यायालयीन कोठडी दिली आहे. आज कणकवली येथील न्यायालयात यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होत आहे. त्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी राणे यांना कोल्हापुरात आणण्यात येणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा