Breaking

शुक्रवार, १८ फेब्रुवारी, २०२२

*कुरुंदवाड येथील सर्वोदय दिन व गांधी मेळाव्यात जयसिंगपूर कॉलेज NSS च्या विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग*

   

सर्वोदय व गांधीवादी मेळावा


*विक्रांत माळी : कुरुंदवाड प्रतिनिधी*


       कुरुंदवाड : कुरुंदवाडच्या महात्मा गांधी विचार प्रचार समितीच्या वतीने कृष्णा-पंचगंगा संगम घाटावर १२ फेब्रुवारी,२०२२ रोजी सर्वोदय दिन व गांधी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमास असंख्य गांधीवादी विचारवंत व कार्यकर्ते उपस्थित होते.

  १२ फेब्रुवारी १९४८ रोजी महात्मा गांधी यांचे पवित्र अस्थीचे विसर्जन करण्यात आले होते. त्या दिवसापासून आज पर्यंत गेली ७४ वर्षे १२फेब्रुवारी हा दिवस गांधीवादी कार्यकर्त्यां -साठी, स्वातंत्र्यसैनिक व सर्वोदय, सामाजिक कार्यकर्ता च्यासाठी सर्वोदय दिन व गांधीवादी मेळावा म्हणून हा दिन साजरा केला जातो.

   या कार्यकर्ता मेळावाच्या निमित्ताने गांधीवादी कार्यकर्ते व शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्याकडून साफसफाई करण्यात आली.सर्व मान्यवरांनी म.गांधीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून, सुरवातीस मा.आबा कांबळे यांनी रघुपती राघव राजाराम, ओमकार या प्रार्थनेने सुरवात केली. प्रारंभी या समितीचे सदस्य बाबासो नदाफ यांनी उपस्थित असणाऱ्या मान्यवर व विद्यार्थी यांचे स्वागत करून या मेळाव्याच्या आयोजनाचा हेतू स्पष्ट केला. ते म्हणाले की,या जगाचा उद्धारकर्ता व अखंड मानवजातीला माणूसपण देणारा  गांधी या असामान्य कर्तुत्ववान महात्म्याने जगाला एक दिशा दिली. या महात्मा नावाच्या व्यक्तीचा समग्र अभ्यास व वैचारिक मंथन व्हावे ही अपेक्षा या निमित्ताने आहे.

        उपस्थित मान्यवर व गांधीवादी विचारवंत  यांचा परिचय राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय संघटक बाबासो नदाफ यांनी करून मेळाव्यातील विद्यार्थ्यांची स्फूर्ती जागृत करण्याचा प्रयत्न केला.गांधी विचारवंत मा. चंद्रकांत झटाले यांनी हे आपल्या मनोगतातून म्हणाले की, खरे संत गाडगे महाराज होते आणि राष्ट्रपती महात्मा मोहनदास करमचंद गांधी 'मजबुरी का नाम गांधी' असा विचार जाणीपूर्वक पेरणारे धर्मांध शक्ती ,संघटना व काही राजकीय पक्ष आहेत. मात्र याच गांधीजींचे जगात ७० देशामध्ये पुतळे उभे करण्यात आले. तसेच जगातल्या ६०० विद्यापीठ मध्ये गांधीजीचे तत्त्वज्ञान शिकवले जाते.महात्मा गांधीजी यांच्यावर जवळपास १ लाख ८ हजार पुस्तके लिहिली गेली यानंतर भगतसिंग यांची फाशी थांबवण्यासाठी सर्वोच्च प्रयत्न गांधीजींनी केले, लोर्ड इरविन यांना गांधीजी समजावून सांगत होती की भगतसिंग यांना फाशी देऊ नका यासाठी गांधीजीने पाच पत्रे लिहिली गेल. लोकमान्य टिळक हे काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते.मात्र १९२० रोजी टिळक वारले. त्यानंतर अधिवेशनाचे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष महात्मा गांधी होते. नथुराम गोडसे यांनी गांधीजींना प्रार्थने वेळी बॉम्ब टाकून त्यांच्यावर हल्ला केला. ३० जानेवारी १९४८ साली त्यांना गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली अशा प्रकारचे विवेचन झटाले यांनी केले.


   तसेच दुसरे गांधी विचारवंत मा. श्री. उमेश सूर्यवंशी यांनी आपल्या मनोगतात म्हणाले की,म. गांधी ही निर्भीड व्यक्ती होती. सूर्यवंशी यांनी त्यांच्या विचार व कृतीचे अनेक पैलू या सत्रात मांडले. तसेच गांधीवादी विचार कार्यकर्त्यांना समजावून सांगितले. प्रथम सत्राचे आभार कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.अल्लाउद्दीन दानवडे गुरुजी यांनी मानले.          

      दुसऱ्या सत्रात  बाबासाहेब नदाफ,शाहीर रफिक पटेल  यांनी सुरवातीस गांधीजी जीवनावर आधारित पोवडा सादर केला. राष्ट्र सेवा दलाचे बाबासाहेब नदाफ आणि त्याची टीम उपस्थित होती. इचलकरंजीच्या स्मिता पाटील कला मंच यांनी गांधी वरती विविध गाणी सादर केली.

     अंतिम सत्रात ज्येष्ठ साहित्यिका मानीलमताई माणगावे व माजी प्राचार्य डॉ.राजेंद्र कुंभार यांनी विविध गांधीवादी विचाराला स्पर्श करीत मांडणी केली. त्यानंतर निबंध व वक्तृत्व स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आला. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाचा समारोप झाला.                              

     या कार्यक्रमास मा.हसन देसाई,  मा.महेश घोटणे आणि मा.वाय.डी. चव्हाण,डॉ.चिदानंद पत्रकार दगडू माने,डॉ. मनोहर कोरे ,डॉ. तुषार घाटगे ,प्रा. शांताराम बापू कांबळे गांधीवादी नेते व कार्यकर्ते वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थी, जयसिंगपूर कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी, कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ प्रभाकर माने, प्रा.मेहबूब मुजावर,जीवन आवळे, नेहा राठोर आणि तसेच या कमिटीतील सर्व पदाधिकारी व अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा