अनोळखी व्यक्तीने गतिमंद मुलीवर केलेले अत्याचार |
जयसिंगपूर : जयसिंगपूर शहरात एका १९ वर्षीय गतिमंद मुलीवर अत्याचार झाल्याची फिर्याद दाखल केली. सदर पीडित युवतीवर अनोळखी इसमा कडून अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे.
अधिकृत सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार अडीच ते तीन महिन्यापूर्वी घरात कोणी नसताना अनोळखीने युवतीच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केले. यातून सदर युवती ही गर्भवती असल्याचे निदर्शनास आले. याबाबत मुलीच्या आईने अनोळखी व्यक्ती विरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
सदरच्या घटनेने परिसरात संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा