Breaking

बुधवार, २ फेब्रुवारी, २०२२

*दुःखद वार्ता ! मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील सिने अभिनेते रमेश देव यांनी वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास*


रमेश देव यांचे दुःखद निधन


    मराठी आणि हिंदी चित्रपटांमधील प्रसिद्ध सिने अभिनेते रमेश देव यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अंधेरी येथील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

      त्यांची पत्नी सीमा देवही प्रसिद्ध सिनेअभिनेत्री असून मुलगा अजिंक्य देव अभिनेता तर दुसरा मुलगा अभिनव हा दिग्दर्शक आहे. आनंद सारख्या प्रसिद्ध चित्रपटासह शेकडो चित्रपट रमेश देव यांनी केले आहेत.

     त्यांनी आपल्या अभिनय कौशल्याने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. दरम्यानच्या काळात त्यांनी राजकारणात शिरकाव केला पण यश न मिळाल्यामुळे त्यांनी त्यातून संन्यास घेतला. मृत्यूच्या शेवटच्या श्वासापर्यंत रमेश देव यांनी आपल्या अभिनयाची साद/ भुरळ चाहत्यांना घातली.

    त्यांच्या जाण्याने चित्रपट सृष्टीत कलेची पोकळी निर्माण झाली. चित्रपट सृष्टीतील देवरूपी रमेश कालवश झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा