आत्महत्या केलेला तरुण संदिप साळवी |
*जीवन आवळे : विशेष प्रतिनिधी*
इचलकरंजीच्या विक्रम नगर परिसरातील कारखान्यात तरुण यंत्रमागधारकांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. संदीप आप्पासो साळवी वय वर्ष ३५ महालक्ष्मी, गल्ली नंबर ३ शहापूर असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी मोहन धोंडीबा ढापळे रा. शहापूर यांनी गावभाग पोलिसात फिर्याद दिली आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही
याबाबत अधिकृत सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, शहापूर परिसरातील महालक्ष्मी नगर येथील यंत्रमाग धारक संदीप साळवे यांचा विक्रम नगर येथील लोंढे गल्लीत यंत्रमाग कारखानाअसून ते भाड्याने चालवत होते. या कारखान्यात रात्रपाळीत काम करणारा कामगार बुधवार २३ जानेवारी,२०२२ रोजी सकाळी घरी गेल्यानंतर स्वतः संदीप साळवी यंत्रमाग चालवत होते. थोड्या वेळानंतर कारखान्यातील यंत्रमाग बंद पडल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले त्यामुळे कारखान्यात जाऊन पाहिले असता संदीपने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. याबाबत माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
त्यांच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा