Breaking

गुरुवार, ३ फेब्रुवारी, २०२२

*जयसिंगपूर कॉलेजच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा ; शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र विषयाच्या गुणवत्ता यादीत कॉलेजच्या तीन विद्यार्थिनी चमकले*


कु.यास्मिन मुल्ला, कु.सोनाली तगारेकु.अनुराधा जुगळे

*प्रा.डॉ. महावीर बुरसे  : विशेष प्रतिनिधी*


जयसिंगपूर  : अनेकांत एज्युकेशन सोसायटी बारामतीचे जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूरच्या एम.ए. अर्थशास्त्र विभागातील ३ विद्यार्थिनी शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र विषयाच्या गुणवत्ता यादीत चमकल्या आहेत.


     सन- २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या वतीने विषयनिहाय शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता यादी जाहीर केली जाते. त्यानुसार शैक्षणिक वर्षे २०२०-२१ या वर्षांमध्ये शिवाजी विद्यापीठ एम.ए.अर्थशास्त्र गुणवत्ता यादीत सर्व प्रथम कु.यास्मिन हारुण मुल्ला, तृतीय क्रमांक कु.सोनाली तगारेसातवा क्रमांक कु. अनुराधा जुगळे या विद्यार्थिनी शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत झळकल्या. तसेच कु. यास्मिन मुल्ला हीने सामाजिक शास्त्र या विद्याशाखेत दहाव्या स्थानी आपलं नाव कोरले आहे. सदर विद्यार्थिनी मिळवलेल्या या सुयशाने कॉलेजच्या शिरपेचात पहिल्यांदाच अर्थशास्त्र विभागाने मानाचा तुरा रोवला गेला. 

       मुळात या तिन्ही विद्यार्थिनी कॉलेजमधील अष्टपैलू गुणवंत विद्यार्थी होत्या. मात्र तिघींची ही आर्थिक परिस्थिती हलाखीची असून आई-वडिलांनी दिलेल्या संस्काराची शिदोरी, उच्च शिक्षण घेण्यासाठी दिलेला शैक्षणिक पाठिंबा, गुरुवर्यांनी दिलेल्या ज्ञानाचा आधार व  ठेवलेला विश्वास, संस्थेने व कॉलेजने केलेले सहकार्य व प्रामाणिक प्रयत्न या सर्वांमुळे हे सुयश मिळविले असल्याचे ते सांगत आहेत.

   या विद्यार्थिनींच्या सुयशामध्ये संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुभाष अडदंडे, सचिव डॉ. महावीर अक्कोळे, संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य त्याचबरोबर कॉलेजच्या प्र.प्राचार्य डॉ.मनिषा काळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रभाकर माने,डॉ.व्ही.बी. देवकर,प्रा. स्वाती बस्तवाडे, प्रा.दिपाली कोळी,प्रा. स्वाती माळकर,प्रा. मेहबूब मुजावर, प्रा. हेगडे-पाटील व कार्यालयीन अधिक्षक संजीव मगदूम यांचे सहकार्य लाभले.

       सदर विद्यार्थिनींने मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा