Breaking

शनिवार, १९ फेब्रुवारी, २०२२

*शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर स्वराज्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने रक्तदान,नेत्र तपासणी-आरोग्य शिबिराचे आयोजन व गुणवंतांचा गौरव*

 

प्रख्यात वकील मा.दिलशाद मुजावर मार्गदर्शन करताना 

जीवन आवळे : जयसिंगपूर प्रतिनिधी


जयसिंगपूर : आज १९ फेब्रुवारी,२०२२ रोजी जाणता राजा व महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिन सोहळा निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणीजनांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सचिनभाऊ कांबळे व मतीन भाई काझी तसेच या कार्यक्रमाच अध्यक्षस्थानी अँड.दिलशाद मुजावर लाभल्या होत्या.

           या  कार्यक्रमातील मान्यवर घटकांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष एजाज भाई मुजावर यांनी केले. संस्थेचे सचिव अण्णाप्पा ऐनापुरे यांनी संस्थेच्या कार्याचा संक्षिप्त आढावा घेत कार्यक्रम आयोजनाचा हेतू स्पष्ट केला.

       त्यानंतर स्वराज्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या घटकांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये महिला उद्योजिका पुरस्कार- सौ. महादेवी शेषगोंडा पाटील, युवा उद्योजक गौरव पुरस्कार-मा. राजू मगदूम, युवा समाज पुरस्कार - मा. राकेश वैदु, युवा उद्योजक पुरस्कार- मोहसीन चमनशेख, युवा उद्योजक गौरव पुरस्कार- हेमंत रसाळ, समाज कार्य गौरव पुरस्कार-मा. रफीक गुलाब नदाफ या सत्कार मूर्तींना सन्मानपत्र,शाल व रोप देऊन प्रदान करण्यात आला.

       कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सचिनभाऊ कांबळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा कार्याचा आढावा घेत स्वराज्य या संस्थेने केलेल्या कामाचा गौरव उल्लेख केला. यावेळी संभाजीपूरच्या ग्रामपंचायत सदस्य,मा.सौ. मनिषा पवार यांनीही छत्रपती शिवरायांच्या हिंदू-मुस्लीम ऐक्याबाबतची प्रबोधन करणारे विचार प्रस्तुत केले.

     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विराजमान असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या व प्रख्यात वकील अँड. मा.सौ.दिलशाद मुजावर यांनी छत्रपती शिवरायांच्या कार्याचा नामोल्लेख करीत शिवजयंतीच्या निमित्ताने प्रत्येक धर्मातील व जातीतील स्त्री-पुरुषांचे कर्तव्य आहे की, आपण सर्वांनी छत्रपती शिवरायांच्या कार्याचा विचार आचरणात आणावा. सद्यपरिस्थितीत महिला सक्षमीकरण होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर बालके व युवा पिढी वाममार्गाला जात असताना  प्रत्येक कुटुंबातील महिलेचे संस्कार जिजाऊ माते सारखा असले पाहिजे. त्याचबरोबर युवक युवतीचे प्रबोधन होणे महत्त्वाचे आहे. याप्रसंगी त्यांनी संस्थेच्या कामकाजाचे व आगळ्यावेगळ्या शिवजयंती सोहळ्याचं कौतुक केले.

        संस्थेच्या वतीने रक्तदान, नेत्ररोग चिकित्सा व  संपूर्ण आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. यासाठी सांगली जिल्ह्यातील MSI ब्लड बँक,मेहता व एस.पी.पी. मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलचे सहकार्य लाभले.सदर शिबिरास लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात  प्रतिसाद दिला.

      या कार्यक्रमास मा.गणपतराव पाटील (चेअरमन दत्त साखर कारखाना), माजी नगरसेवक प्रा. असलम फरास व मा.बजरंग खामकर,युवा उद्योजक अभिजीत भांदिगरे, शिवसेना शहर प्रमुख तेजस कुराडे-देशमुख, शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख सौ.रेखा जाधव, ग्रामपंचायत सदस्य मनिषा पवार हे मान्यवर उपस्थित होते.

      या कार्यक्रमाचा उत्तम संयोजन अध्यक्ष मा.एजाज मुजावर, सचिव अण्णाप्पा ऐनापुरे, पत्रकार व संस्थेचे सल्लागार मा.इकबाल इनामदार, निर्भीड पत्रकार रोहित जाधव,पत्रकार राजू सय्यद,पत्रकार संजय सुतार व पत्रकार जीवन आवळे व अन्य सदस्यांनी सहकार्य केले. रोटरी क्लब ऑफ जयसिंगपूरचे  सहकार्य लाभले.

   या कार्यक्रमाचं उत्तम व नेमकेपणाने सूत्रसंचालन सौ.गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रा.डॉ.प्रभाकर माने यांनी मानले.

     या अनोख्या रचनात्मक शिवजयंती उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा